मंगळवेढा प्रतिनिधी
स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या देशाची नौका चालवण्याचे काम शिक्षकांनीच पार पाडले असल्याचे प्रतिपादन प्रा . 'विश्वनाथ ढेपे यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली
लोकमंगल बँकेच्या मंगळवेढा शाखेच्या वतीने आयोजित शिक्षक गौरव कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नीट परीक्षा मार्गदर्शक तथा सुप्रसिद्ध वक्ते प्रा . विश्वनाथ ढेपे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना प्रा .विश्वनाथ ढेपे म्हणाले की, शिक्षक हा ज्ञानाचा अखंड झरा आहे. निष्ठा आणि कर्तव्य म्हणजेच शिक्षक असून श्रद्धा, भक्ती व शक्ती याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे शिक्षक आहेत. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांचे कडून आपणास ज्ञान मिळते त्यांच्याकडे पाहण्याचे सकारात्मक दृष्टी मिळते. शिक्षकांना मातीची भांडी घडवण्याच्या कलाकाराची भूमिका निभवावी लागते, शिक्षकांच्या ज्ञानातून उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरवणारे आहे.
याप्रसंगी MPSC मधून सांख्यिकी अधिकारी राजपत्रित गट (ब) उत्तीर्ण झालेले श्री. अतिश सिताराम तानगावडे यांचा विशेष गौरव करण्यात आला या कार्यक्रमात सत्कारमूर्ती श्री. अर्जुन आवताडे, श्री. अतिश तानगावडे, शिक्षक नेते श्री. संजय चेळेकर, मंगळवेढा तालुका बार असोसिएशन अध्यक्ष मा . अँड. उल्हास माने यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिक्षक श्री.बाळासाहेब आवताडे, श्रीमती दिपाली माळी, श्रीमती पल्लवी लुगडे, श्री. दत्तात्रय कुलकर्णी, श्री. रामचंद्र कांबळे, श्रीमती आयेशा मुलाणी, श्री. विलास सरगर, श्री सुशेन क्षिरसागर, श्री. धोंडाप्पा सावंत, श्री. अर्जुन आवताडे, श्री. पंडित आठवले, श्री. राजाराम देवकते, श्री. तानाजी सूर्यवंशी, श्री. दत्तात्रय येडवे, श्री. राजकुमार धनवे या शिक्षकांचा व विशेष सत्कार MPSC मधून सांख्यिकी अधिकारी, राजपत्रित गट (ब) उत्तीर्ण श्री. अतिश सिताराम तानगावडे यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री शिवाजी दरेकर साहेब यांनी केले व आभार श्री. संभाजी तानगावडे यांनी मानले. कार्यक्रमास बँकेच्या संचालिका सौ. उज्वलाताई संजय चेळेकर, मा प्रा . श्री. विश्वनाथ ढेपे, मा. अँड. उल्हास माने, शिक्षक नेते श्री. संजय चेळेकर व मोठया संख्येने शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमंगल को. ऑप. बँक शाखा मंगळवेढा. चे मॅनेजर श्री सचिन पलंगे साहेब व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.