सायकल रिंगण सोहळ्यात वारी परिवार सायकल क्लब निघाला भक्तीरसात न्हाऊन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ७ जुलै, २०२४

सायकल रिंगण सोहळ्यात वारी परिवार सायकल क्लब निघाला भक्तीरसात न्हाऊन.


मंगळवेढा:- 

वारी पंढरीची सेवा वसुंधरेची या उद्देशाने पंढरपूर सायकल असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या तृतीय अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकलवारी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.


अनेक संताच्या पालख्या आषाढी वारीसाठी पंढरीच्या दिशेने येत असताना पंढरपूर नगरीत ७ जुलै रोजी पार पडलेल्या सायकल रिंगण सोहळ्यात मंगळवेढ्याचा वारी परिवार सायकल क्लब विठूरायाच्या नामघोषात दंग होऊन भक्तीरसात न्हाऊन निघाला.


सुरवातीस विठ्ठल-रुक्मिणी मंदीराभोवती महानगर प्रदक्षिणा घालून नयनरम्य असा सायकल रींगण सोहळा पार पडला.यावेळी नामवंत सायकलपट्टू कबीर राचूरे,हभप शिवाजी महाराज मोरे,श्रीनिवास वायकर,उमेश परिचारक,आदी मान्यवरांच्या हस्ते वारी परिवार सायकल क्लबचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.


पर्यावरण पूरक आणि आरोग्य संवर्धक या सायकल वारीमध्ये यावर्षी महाराष्ट्र राज्यातून ४३ सायकल क्लबचे १८०० सायकस्वार सहभागी झाले होते.


नेहमीच पर्यावरण रक्षण आणि समाज प्रबोधनासाठी कार्य करणाऱ्या वारी परिवार सायकल क्लबने सलग तिसर्‍या वर्षी सायकल संमेलनात सहभाग नोंदवून संतनगरीची ओळख कायम ठेवलेली आहे.


सदर सायकल संमेलन वारीच्या ५० किलोमीटर राईडमध्ये शरद हेंबाडे,चंद्रजीत शहा,समर्थ महामुनी,सिद्धेश्वर डोंगरे,डॉ.राहुल शेजाळ,महेश अलिगावे,स्वराज कलुबर्मे,विवेकानंद वाले,अरमान शेख,शुभम टेकाळे,हर्षराज जावळे,पांडुरंग कौडूभेरी,अजय आदाटे,प्रा विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू आदी राईडर सहभागी होते.


test banner