श्री संत दामाजी महाविद्यालयात सीईटी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ५ जुलै, २०२४

श्री संत दामाजी महाविद्यालयात सीईटी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न.


मंगळवेढा:-

श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या वतीने सन २०२४ मध्ये झालेल्या एम एच टी सीईटी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रभारी प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव व उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यामध्ये सानिया मुजावर ९९.०१ पर्सेंटाईल,ओंकार मिसाळ ९५.१८ पर्सेंटाईल,गायत्री भोसले ९४.३२ पर्सेंटाईल,महेश सोमदळे ९१.१९ पर्सेंटाईल,प्रतीक्षा लंगोटे ९०.६१ पर्सेंटाईल गुण मिळवून सीईटी परीक्षेत आदी विदयार्थ्यांनी यश संपादन केले आहे.


यावेळी सानिया मुजावर हिने अभ्यास करताना कोणती योग्य तयारी करावी असे सांगून सर्व शिक्षकांचे आभार मानले यावेळी प्राचार्य जाधव म्हणाले सीईटीच्या निकालातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करून आम्ही सुद्धा काही कमी नाही हे दाखवून दिले आहे यामुळे महाविद्यालयाच्या नावलौकीकात निश्चितपणे भर पडली आहे.


कोणत्याही क्षेत्रात गेल्यावर त्यामध्ये मोठे व्हा असे सांगून सर्व गुणवंताचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी प्राचार्य डॉ. औदुंबर जाधव,प्रा.राजकुमार मुळीक,प्रा.उत्तम सूर्यगंध,प्रा.विजय पावले,प्रा.आप्पासाहेब ढाणे,प्रा.सारिका काटे,प्रा.शारदा खुणे,प्रा. कविता क्षीरसागर,प्रा.निर्मला सावंत यांचेसह सर्व शिक्षक,पालक उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले तर प्रा.राजेंद्र गायकवाड यांनी आभार मानले.


test banner