प्रतिनिधी:-
मंगळवेढा नगरीतील संत चोखामेळा स्मारकाची पूर्तता लवकरच होईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आषाढी वारीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री पंढरपूर दौऱ्यावर आले असताना संत चोखामेळा मंदिर समिती व वारी परिवाराच्या शिष्टमंडळाने भेटून प्रलंबित स्मारकाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा या मागणीचे निवेदन दिले.
यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी सदर प्रस्तावाच्या निधीची मंजुरी देऊन अंमलबजावणी होऊन मंगळवेढेकरांची स्वप्नपूर्ती करावी अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली तर अविनाश शिंदे यांनी स्मारकाच्या नियोजित आराखड्यातील माहिती दिली.
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत,आमदार समाधान आवताडे,जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते.
काही दिवसापूर्वीच मंगळवेढा नगरपरिषदेच्या सभागृहात स्मारकासंदर्भात झालेल्या बैठकीत स्मारकाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वारी परिवाराने पुढाकार घ्यावा असे ठरल्या नंतर वारी परिवाराने मात्र त्वरितच आमदार आवताडे यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे.
यावेळी गिरीश महाजन यांनीही संबधित अधीकाऱ्यांना दूरध्वनी वरून संपर्क साधून सूचना दिल्या आहेत. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष जयराज शेंबडे,सचिव अविनाश शिंदे,सोमनाथ आवताडे,राजवीर हजारे,प्रफुल्ल सोमदळे,भरत राजपुरोहीत,गणेश ओमणे,राज शिंदे,प्रा.विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू आदीजण उपस्थित होते.