मंगळवेढा:-
श्री क्षेत्र शेगावहुन आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीतील सर्व वारकऱ्यांना श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करून वारकऱ्यांना पाणी व बिस्किटे वाटप करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ औदुंबर जाधव यांच्या हस्ते गजानन महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला सर्व शिक्षकांनी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विदयार्थ्यांनी श्री गजानन महाराजांचे दर्शन घेत जयघोष केला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव,उपप्राचार्य प्रा. राजेंद्र गायकवाड यांचेसह सर्व शिक्षक राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.