मंगळवेढा:-
युवक नेते विजयसिंह मुरलीधर दत्तू यांच्या वाढदिवसानिमित्त गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमास धान्यदान करण्यात आले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आयुष्याच्या अंतिम उंबरठ्यावर असणाऱ्या गरजू वृद्धांना विना मोबदला व कोणताही शासकीय अनुदाना व्यतिरिक्त सांभाळ करणाऱ्या संस्थेस धान्य दान करण्यात आले.
तरी असा उपक्रम इतरांनाही राबवावे असे आवाहन मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक धनंजय राक्षे यानी केले या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू,एजाज इनामदार,स्वप्निल बुरजे,अक्षय नागणे,अजिंक्य केदार, अभयसिंह दत्तू उपस्थित होते.