स्री हिच खरी कुटूंबाची मॅनेजमेंट गुरू असते :- डॉ संगीता पाटील. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ७ मार्च, २०२४

स्री हिच खरी कुटूंबाची मॅनेजमेंट गुरू असते :- डॉ संगीता पाटील.


मंगळवेढा:-

प्रत्येक कुटुंबाची खरी मॅनेजमेंट गुरू ही त्या कुटुंबातील स्त्रीच असते असे मत डॉ.संगीता पाटील यांनी व्यक्त केले.ते श्री संत दामाजी महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.


अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एन.बी.पवार उपस्थित होते सुरुवातीस राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी डॉ पाटील म्हणाल्या की, जागतिक महिला दिन आपण स्त्री-पुरुष स्पर्धा म्हणून साजरा करत नसून आपले हक्क जोपासणे, अस्तित्व टिकवणे,समाजात आपले स्थान निर्माण करणे,जीवन समृद्ध करणे,इतरांशी स्पर्धा न करता स्वतःचा विकास साधणे यासाठी हा जागतिक महिला दिन साजरा केला पाहिजे.


आपण जीवन जगत असताना आपले जीवन समृद्ध करत असताना आपल्या व्यक्तिमत्त्वाचाही विकास झाला पाहिजे,आपल्यात आत्मविश्वास आला पाहिजे हे सांगत असताना त्यांनी अनेक महान स्त्रियांच्या जीवनावर प्रकाश टाकून स्त्री सामर्थ्याचा गुणगौरव केला.


स्त्री ही खऱ्या अर्थाने उत्तम व्यवस्थापन करणारी असते त्यातून ती कुटुंबाचे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करते पण ती स्वतःच्या आरोग्याचे व्यवस्थापन करताना मात्र हेळसांड करते महिलांनी स्वतःच्या शरीराकडे लक्ष देऊन आरोग्य सांभाळावे आजार होऊच नये म्हणून काळजी घ्यावी सध्या परीक्षेचा कालावधी आहे.


अशा काळात विद्यार्थ्यांनी,विद्यार्थिनींनी योग्य आहार घेऊन आरोग्याकडे लक्ष देऊन अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून अभ्यास करावा असेही सांगितले तसेच चिमणी आणि कावळ्याच्या गोष्टीतून चिमणीचा कुटुंबासाठीचा त्याग किती असतो हा विचारही त्यांनी मांडला.


अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.बी. पवार म्हणाले की,आपण जागतिक महिला दिन साजरा करतो पण तो का करायचा यापाठीमागची भूमिका अगोदर समजून घेतली पाहिजे.


खऱ्या अर्थाने कुटुंबात,समाजात आणि व्यवहारात स्त्री-पुरुष समानता आली पाहिजे स्त्रियाबद्दलच्या चुकीच्या समजुती,अंधश्रद्धा नाहीशा झाल्या पाहिजेत स्त्री पुरुष ही रथाची दोन चाके आहेत,ती बरोबरीने चालली पाहिजेत आजच्या या गतिमान युगात स्त्रियांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याचा,स्वावलंबी होण्याचा संकल्प करून रोजगार न मागता स्वतः रोजगार देणारे झाले पाहिजे व्यवसाय करताना न लाजता तो स्वतः झोकून देऊन केला की त्यामध्ये यश नक्की मिळते.


व्यवसाय करत असताना विक्रीचे कौशल्य आत्मसात केल्यास मोठा नफा त्यातून मिळवता येतो हे सांगत असताना कोरेगाव येथील महिलेने उद्योग उभारून त्यामध्ये मोठी भरारी घेतल्याचे उदाहरण देऊन त्यातून सर्वांनी आदर्श घ्यावा असे आवाहनही केले.


यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून स्री नारीचा गुणगौरव केला महिला दिनानिमित्त महाविद्यालयातील प्राध्यापिकांचा व विद्यार्थिनींचा सत्कार करून गौरव करण्यात आला.


प्रास्ताविक प्रा.अर्चना कदम यांनी तर पाहुण्यांची ओळख प्रा. सारीका काटे यांनी करून दिली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सरीता माने यांनी केले तर प्रा.निर्मला सावंत यांनी आभार मानले यावेळी उपप्राचार्य प्रा.सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा.राजेंद्र गायकवाड,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.राजकुमार पवार यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
test banner