प्रतिनिधी:-
शुक्रवारी लोकसभा निवडणुकी बाबत चर्चा करण्या साठी निवडणूक आयोगाची बैठक झाली.गुरुवारी नुकतेच नियुक्त झालेले निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार उपस्थित होते.
शुक्रवार रोजी झालेली ही बैठक 40 ते 50 मिनीटे चालली.40 ते 50 मिनिटे चाललेल्या या बैठकी मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि नुकतेच नियुक्त झालेले दोन्ही निवडणूक आयुक्त सहभागी होते.
त्या झालेल्या बैठकी मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांबाबत निर्णय घेण्यात आला.लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोग उद्या शनिवार दि. 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.
त्या पत्रकार परिषद मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत.तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होणार आहे.