राज्यमंत्री मंडळ बैठकी मध्ये घेण्यात आले हे निर्णय, यांच्या मानधनांमध्ये वाढ तर या शहराचे नाव बदलले. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १४ मार्च, २०२४

राज्यमंत्री मंडळ बैठकी मध्ये घेण्यात आले हे निर्णय, यांच्या मानधनांमध्ये वाढ तर या शहराचे नाव बदलले.


प्रतिनिधी:-

आगामी लोकसभेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरती राज्य मंत्री मंडळाकडून विविध निर्णय घेण्यात आले.त्यामध्ये राज्यातील पोलिस पाटील यांच्या मानधनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.


पोलीस पाटील संघटनेकडून पोलिस पाटील यांच्या कडून हा विषय बऱ्याच वेळा लाऊन धरण्यात आला होता.


आता पोलिस पाटील यांना प्रती माहा. १५००० रुपये मानधन मिळणार असल्याचा निर्णय बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.


त्या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांसाठी विविध निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा विज देण्यासाठी वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार असे सांगण्यात आले.


त्यानंतर महानंद प्रकल्प नफ्यात आणून त्या प्रकल्पाची स्थिती सुधारण्यात येणार असून शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत वाढ करून  ते २५,००० पर्यंत करण्यात येणार आहे. 


तसेच आशा स्वयंसेविका यांच्या मानधनामध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे.


तसेच अहमदनगरचे नाव बदलून पुण्यश्लोक आहिल्यादेवी नगर असे करण्यात आलेले आहे.तसेच पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्याची मान्यता दिली गेली आहे.


ग्राम सडक योजने अंतर्गत २३००० किलो मीटर रस्ते बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.जालना खामगाव नवीन ब्रोडगेज रेल्वे मार्ग.तसेच ब्रिटीश कालीन ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात येणार.


या वर्षभरामध्ये दहा हजार किमी.रस्ते करण्यात येणार.


अश्या प्रकारचे निर्णय मंत्री मंडळच्या बैठकीत घेण्यात आले.


test banner