मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांच्या सिंचन योजनेस मंत्री मंडळाची मान्यता आमदार प्रणिती शिंदे यांच्या दबावामुळे शासनाचा निर्णय – प्रशांत साळे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १३ मार्च, २०२४

मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांच्या सिंचन योजनेस मंत्री मंडळाची मान्यता आमदार प्रणिती शिंदे यांच्या दबावामुळे शासनाचा निर्णय – प्रशांत साळे



मंगळवेढा:-

तालुक्यातील 24 गावांमध्ये प्रत्यक्ष गाव भेटी देऊन त्या ठिकाणच्या लोकांबरोबर मी या लढ्यामध्ये तुमच्याबरोबर आहे असे आश्वासन देऊन सदरचा प्रश्न मी मार्गी लावण्यासाठी कायमस्वरूपी तुमच्याबरोबर आहे आणि मी या संदर्भात पाठपुरावा करणारच, असे ठणकावून सांगितल्यानंतर सदरचा मेसेज विरोधी पक्षाला पोचल्यामुळे आणि काँग्रेसच्या आक्रमकतेमुळे विरोधी पक्षाला नमते घेऊन आज झालेल्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना सदरच्या 24 गावाच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी देण्यासाठी भाग पाडले. 


सदरच्या 24 गावाच्या उपसा सिंचन योजनेसाठी शासनाने मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिल्याबद्दल मंगळवेढा तालुक्यातील 24 गावच्या जनतेच्या वतीने मी शासनाचे आभारी आहे व भविष्यात शासनाने सदर प्रकल्प योजनेस कालावधी ठरवून देऊन त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा मी सदरच्या निधीसाठी पाठपुरावा करण्यासाठी जनतेतून उठाव करणार आहे.


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य आमदार प्रणिती शिंदे यांनी 12 फेब्रुवारी 2024 रोजी २४ गावच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात मंगळवेढा पक्ष कार्यालयामध्ये 24 गावच्या सरपंच उपसरपंच व लोक प्रतिनिधीची बैठक आयोजित करण्यात आली होती.


त्या बैठकीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी ताईंनी यांनी हा प्रश्न विधानसभेत लावून धरण्यास सांगितले त्याचबरोबर ताईंनी हा प्रश्न विधानसभेत मांडला व सरकारचा दबाव वाढवला तसेच नंतर ताईने या 24 गावच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथे असणाऱ्या लोकांशी व लोकप्रतिनिधीशी समक्ष चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचे आश्वासन दिले होते म्हणून आजपर्यंत रखडत असलेली ही योजना केवळ आणि केवळ प्रणिती ताईंच्या आवाज उठवण्याने मंजूर झाली आहे.


ताईंनी या प्रश्नांमध्ये हात घातला आणि लगेच ही योजना शासनाने मंजुरीसाठी कॅबिनेटमध्ये घेतला म्हणजे लोकप्रतिनिधींचाही पायगुण चांगला असणे खूप महत्त्वाचे असते हे या ठिकाणी अधोरेखित करावे लागेल.प्रणिती ताईंनी दिलेले आश्वासन पूर्ण केल्याबद्दल समस्त मंगळवेढाकरांच्या वतीने तालुकाध्यक्ष म्हणून मी त्यांचा शतशः आभारी आहे.

तालुकाध्यक्ष : प्रशांत साळे

मंगळवेढा काँग्रेस कमिटी.



test banner