मंगळवेढा:-
भारतीय जनता युवा मोर्चाच्या मंगळवेढा शहरअध्यक्ष पदी सुशांत हजारे यांची निवड करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुदर्शन यादव यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
या आधी हजारे यांनी याच पदावरती आपल्या कामातून त्यांनी ओळख निर्माण केली आहे.
तसेच पक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रम,सामजिक उपक्रम,आंदोलने यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या आधी त्यांनी अनेक आंदोलने करत आवाज उठवत सुशांत हजारे यांनी सर्वसामान्यांच्या हिताची अनेक कामे केली आहेत.
या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव,किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नागेश डोंगरे, कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष आदित्य हिंदुस्तानी आदी मान्यवर,भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.