पेरुला गरिबांचे फळ तसेच उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील 'सफरचंद ' असेही म्हटले जाते. या फळापासून गेली, जाम, रस सरबत, आईस्क्रीम ई. पदार्थ तयार करतात. अशा या महत्वाच्या फळ पिकावर ७० टक्क्यांपेक्षा जास्त किडीची नोंद झालेली आढळते.
त्यापैकी फळमाशी, साल पोखरणारी अळी, पिठ्या ढेकुण (मिलिबग) आणि स्पायरेलिंग पांढरी माशी या किडी आर्थिक नुकसान करणाऱ्या आहेत. तसेच विविध रोगापैकी देवी रोग, फांद्यावरील खेया इ. रोग आढळून येतात. त्यापैकी देवी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
पेरू वरील शेंडे अळीच्या नियंत्रणासाठी अडीच मिलि ॲग्रीकॉस क्लोरॉन ५० प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पेरू देवी रोग नियंत्रण :
ढगाळ वातावरणात देवी रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. नियंत्रणासाठी एस - सी फॉर्म्युला ची फवारणी करावी. यासाठी २०० लिटर पाण्यात ५०० मिली शॅडोफाईट आणि २५ ग्रॅम कंबॉस मिसळावे. त्यानंतर ३-४ दिवसांनी (बी- एक्स - बी फॉर्म्युला) ब्रोमोकॉस १०० ग्रॅम आणि बिटकॉईन किंग २५० ग्रॅम आणि झेनिया ५०० मिली प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
मर रोग नियंत्रण :
दर सहा महिन्यांनी एस - सी फॉर्म्युला ची ड्रेचिंग मिसळून प्रत्येक झाडास बुडाच्या परिसरात द्यावे. प्रादुर्भाव जास्त असल्यास सुपरस्टार २ ग्रॅम आणि क्लोरॉन५० ३ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून ५०० मिली प्रती झाड आळवणी करावी.
मुळावर सूत्रकृमीच्या गाठी :-
(१) लक्षणे :-
पाने बारीक होतात, तसेच पाने पिवळी पडतात.
पेरू बागेतील झाडांच्या मुळांवर गाठी दिसतात.
झाडाचे सेटिंग होत नाही.
झाड मेल्यासारखे होते.
(२) नियंत्रणाचे उपाय :-
सूत्रकृमींचा प्रादुर्भाव असलेल्या बागेमध्ये वर्षातून दोन वेळेस प्रति झाड एस - सी फॉर्म्युला ची ड्रेचिंग ३०० लिटर साठी (१ लिटर शॅडोफाईट आणि १०० ग्रॅम कंबॉस) मिसळून द्यावे किंवा एक लिटर बुडाखली द्यावे.
फळधारणा कमी होत असल्यास, प्रत्येक झाडास झोमटो ५०० मिली, हँगर९ ५०० मिली कीटकनाशक झाडाखाली जमिनीत आळ्यामध्ये एकसारखे मिसळावे.
▪️अशा बागेत चांगल्या ॲग्रीकॉस निंबोळी पेंडीचा वापर दोन किलोग्रॅम प्रतिझाड याप्रमाणात करावा..
मिलीबगचा प्रादुर्भाव :-
पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर, तापमानात वाढ होतेवेळी मिलीबगचा प्रादुर्भाव फांद्या, फुले व फळांचे देठ यावर होण्यास सुरवात होते.
▫️नियंत्रणाचे उपाय :-
प्रत्येक झाडाच्या आळ्यामध्ये २ ग्रॅम व्ही बी एम ही बुरशी १ किलो शेणखताबरोबर मिसळून जमिनीत मिसळावे.
फांद्या व फळांवर मिलीबग दिसताच मिलिकॉस् २.५ मिली फिश ऑईल २.५ मिली व दूध 10 मि.लि. प्रति लिटर पाण्यातून झाडावर फवारावे.
प्रादुर्भाव जास्त असल्यास ५०० ग्रॅम थायासुपर, झोमाटो ५०० मिली पाण्यात मिसळून ड्रेंचींग करावी.
▫️पेरूवरील फळमाशीचे नियंत्रण
साधारण फळे मोठी होत असताना फळमाशीचा प्रादुर्भाव वाढतो.
▫️नियंत्रणाचे उपाय :-
एकरी दहा माक्षिमारी फळमाशीचे सापळे लावावेत. चांगल्या नियंत्रणासाठी सामूहिक पद्धतीने उपाययोजना करणे फायदेशीर ठरते.
प्रादुर्भाव जास्त असल्यास हँगर ९ १.५ मिलि, मिओथ्रीन १ मिली, फिश ऑईल २.५ मिली प्रति लिटर किंवा क्लोरॉन५० २.५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अजय आदाटे (ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रा. लि., पुणे) ९४०३४६०१९४.