मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय जाहीर,मनोज जरांगे पाटील यांचा डेटा मागविणार व काय म्हणाले नोकरी भारती बाबत. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय जाहीर,मनोज जरांगे पाटील यांचा डेटा मागविणार व काय म्हणाले नोकरी भारती बाबत.

   


                  आज लाखो मराठा बांधवांच्या उपस्थित मनोज जरांगे पाटील हे मुंबई च्या वेशीवरती पोहचले असता.सरकारांनी त्यांच्या सोबत चर्चा सुरू केली.

                   त्या चर्चे मध्ये काही सकारात्मक चर्चा झाल्याचे दिसून आले.चर्चे नंतर वाशीच्या छत्रपती शिवाजी चौकात मनोज जरांगे पाटील यांनी सभा घेऊन सरकारने अध्यादेश द्यावा,तोपर्यंत मुंबईतून जाणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली.

                  त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भाषणाला सुरुवात केली व म्हणाले आरक्षणाच्या मागणीसाठी आपण मुंबई मध्ये आलो आहे.सकाळी सरकार बरोबर चर्चा झाली.सरकारने त्यांच्या बरोबर आपलीही भूमिका ऐकली.त्यातील आपली एक मागणी होती की ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या असतील तर त्याचे वाटप करा.

                  "५४ लाख मराठा बांधवांच्या नोंदी मिळाल्यात,त्यांचे वाटप होईल असे ही ते म्हणाले".

                    पुढे बोलताना ते म्हणाले की ५४ लाख प्रमाणपत्रांपैकी ३७ लाख प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती सरकारने दिली आहे."आपण त्यांचा सगळा डेटा मागवला आहे.त्यामध्ये ते ३७ लाख प्रमाणपत्र कोणला दिली याची नावा सोबत माहिती द्या अशी मागणी केली आहे".

                   तसेच कुणबी दाखल्याची एक जरी नोंद सापडली तरी त्याचा ५०-५० जणांना लाभ होतो. अशाप्रकारे २ ते २.५ कोटी मराठे लाभार्थी ठरतात."पुढे बोलताना ते म्हणाले की या प्रमापत्रासाठी आपल्याला अर्ज करणे गरजेचे आहे".गावात ज्यांची नोंद मिळाली आहे त्यांनी अर्ज करण्यास सुरुवात करा असेही जरांगे पाटील म्हणाले.

                    तसेच अंतरवलीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली होती,त्याचे निर्देश दिले आहेत असे सरकारने म्हटले आहे मात्र त्याचे पत्र दिले नाही,आसेही जरांगे पाटील म्हणाले.

                   त्यांनतर सरकारला अध्यादेश काढण्यासाठी उद्या सकाळी 11 पर्यंतचा वेळ/अल्टिमेटम दिला आहे. अध्यादेश नाही काढला तर उपोषणासाठी आझाद मैदानावरती जाणार असल्याचे सांगितले पण आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरणार नाही,असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.तसेच आजचा मुक्काम वाशीमध्येच असेल उद्या मात्र आझाद मैदानावर जाण्याचा त्यांनी सरकारला इशारा दिला.

                    तसेच यामध्ये मराठा समाजाला १०० टक्के मोफत शिक्षण देण्याच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी,शासन आदेश,परिपत्रक काढण्यासाठी त्यांनी आज रात्रीचा वेळ दिला आहे.

                     तसेच उद्या दुपारपर्यंत मागणीबाबत सरकारची प्रतिक्रिया आल्यानंतर आझाद मैदानावर जायचे की नाही ठरणार आहे.

                     जरांगे पाटील यांनी सरकारला नोकरी भारती संदर्भात मागणी केली की ज्या आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती करायची नाही. जर नोकर भरती करायची असेल तर आमच्या जागा राखीव ठेऊन करा अशी मागणी केली आहे.

                      त्यांनतर ते म्हणाले की रात्रभर जीआर वाचून त्याच्यावरती चर्चा करणार आहे.याबाबत काही चर्चा करायची आसेल तर माझ्याकडे या चर्चा करा.मी परस्पर निर्णय घेतला अस कुणी म्हणायला नको.


            

test banner