प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूर येथील जिजामाता स्मारक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २५ जानेवारी, २०२४

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूर येथील जिजामाता स्मारक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

 




                          पंढरपूर - अॅग्रीकल्चर मार्केटिंग वेल्फेअर असोसिएशन, सोलापूर व सोलापूर सीड्स, पेस्टीसाईड्स फर्टीलायझर्स डीलर्स असोसिएशन, सोलापूर कडून भारताचा 75 वा 'प्रजासत्ताक दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.त्यानिमित्ताने 26 जानेवारी 2024 रोजी  सकाळी ८ वाजता जिजामाता स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारी, पंढरपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी समस्त पंढरपूर नागरिक आणि असोसिएशन सदस्य यांनी उपस्थित राहावे.

                          दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा 'प्रजासत्ताक दिन' साजरा केला जातो. आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण देशाची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली. म्हणून हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो.


                            75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधान प्रस्तावना सामूहिक वाचन कार्यक्रम आणि भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 

                           रक्तदान करा मानवतेला प्रमोट करा यानिमित्ताने हे ब्रीदवाक्य असोसिएशन कडून देण्यात आले आहे.

                         शेतकऱ्यांचे आराध्य दैवत पांडुरंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विठ्ठल नगरीमध्ये येत्या २६ जानेवारी २०२४ सकाळी 8.00 वाजता झेंडा फडकविण्यात येईल आणि 10.00 ते दुपारी 4.00  वाजेपर्यंत रक्तदान शिबिर घेण्याचे नियोजन केले आहे. तरी सर्व देशप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान शिबिरास उपस्थित राहूनरक्तदान करून राष्ट्र कार्यात सहभागी व्हावे तसेच आपल्या परिचयातील नागरिकांना सुद्धा उपस्थित राहण्यासाठी उद्युक्त करावे असे आवाहनही असोसिएशन कडून करण्यात आले आहे. 

                         अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी 8087783158 / 9809092333 / 9552243595 संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.


test banner