आज भोगी, साजरी करण्याची अशी आहे परंपरा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

आज भोगी, साजरी करण्याची अशी आहे परंपरा.



आज १४ जानेवारी २०२३ रविवार रोजी भोगी आहे. परंपरेनुसार संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. भोगी सण कसा साजरा करतात, यादिवशी भोग म्हणून कोणते पदार्थ लावतात सर्व काही सविस्तर जाणून घेऊया.

संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करावे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे! जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात, याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात.

असा साजरी करतात भोगी सण

या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात.


या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या शेतात उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो. मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रीत बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतो.

वेगवेगळ्या प्रातांतली पद्धत आणि भोगीची भाजी

मराठवाड्यात या भाजीला 'खेंगट' म्हणतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो . या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण "पोंगल " व आसाम मध्ये " भोगली बिहू " आणि पंजाब मध्ये " लोहिरी " ,राजस्थान मध्ये " उत्तरावन " म्हणून साजरा केला जातो. या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पध्दत आहे. या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी (यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.) तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे.

संकलन 

अजय आदाटे, 

ॲग्रीकॉस एक्सपोर्टस्.



test banner