मंगळवेढा:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंगळवेढा शहराध्यक्ष मा चंद्रशेखर कोंडूभैरी यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त विविध शालेय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल १३ जानेवारी रोजी जवाहरलाल हायस्कूल येथे संपन्न झाला.
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हे माजी उपनराध्यक्ष मुजफ्फर काझी हे होते तर माजी नगराध्यक्ष सोमनाथ माळी, रतनचंद शहा बँकेचे संचालक बजरंग ताड,तालुका उपाध्यक्ष संतोष रणदिवे, मा.शहर उपाध्यक्ष जमीर इनामदार,वैभव ठेंगील,रविराज मोहिते सरचिटणीस अनवर मुल्ला,चिटणीस सुहास मुरडे,अयाज शेख, जवाहरलाल हायस्कूल चे मुख्याध्यापक शंकर आवताडे,शिक्षक वर्ग व आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत चंद्रशेखर कोंडूभैरी यांना वाढदिवासाच्या शुभेच्छा देऊन विजयी स्पर्धक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
त्यांनतर चंद्रशेखर कोंडूभैरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंगळवेढा शहराध्यक्ष मा.चंद्रशेखर कोंडूभैरी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध शालेय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
शहराध्यक्ष कोंडूभैरी यांच्या वाढदिवसानिमित्त रांगोळी,चित्रकला,हस्ताक्षर व निबंध अश्या विविध शालेय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
हस्ताक्षर स्पर्धा:-
१) तानिया कमरूद्दिन काझी प्रथम क्रमांक, इंग्लिश स्कूल ज्यू. कॉलेज मंगळवेढा.
२) अनुजा केशव सासणे द्वितीय क्रमांक,श्री संत दामाजी हाय.
३) श्रवण अरुण गोवे तृतीय क्रमांक, नागणे प्रशाला शाळा नंबर ४.
निबंध स्पर्धा:-
१) जमुना अशोक मेटकरी, प्रथम क्रमांक,जवाहरलाल शेतकी हायस्कूल.विषय:- माझ्या स्वप्नातील मंगळवेढा शहर.
२)ओम शहाजी ढोबळे द्वितीय क्रमांक जवाहरलाल शेतकी हायस्कूल. विषय:- शाहू महाराजांचे सामाजिक व शै.कार्य.
३) अनुजा केशव सासणे,तृतीय क्रमांक,श्री संत दामाजी हायस्कूल विषय:-शाहू महाराजांची सामा.व शै. कार्य.
चित्रकला स्पर्धा:-
१) अक्षरा युवराज शिंदे,प्रथम क्रमांक, श्री संत दामाजी हाय.
२) आरती अण्णा वाघमोडे,द्वितीय क्रमांक,श्री संत दामाजी हाय.
३) अंकिता तायप्पा नलवडे,तृतीय क्रमांक,जवाहरलाल शे.हा.
रांगोळी स्पर्धा:-
१)मोहिनी ज्ञानेश्वर घाडगे, प्रथम क्रमांक, जवाहरलाल शे हा.
२) आरती नानासो खरात,द्वितीय क्रमांक,श्री संत दामाजी हाय.
३) मोहिनी सचिन माळी,तृतीय क्रमांक जवाहरलाल शे.हा.
त्या शालेय स्पर्धेत विजय झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.