दामाजी महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबीरात संत साहित्य काळाची गरज या विषयावर व्याख्यान संपन्न. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

दामाजी महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबीरात संत साहित्य काळाची गरज या विषयावर व्याख्यान संपन्न.

     




                       मंगळवेढा:श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या मौजे फटेवाडी ता मंगळवेढा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिरात दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता वक्ते सुरेश पवार गुरुजी व संतोष फटे यांचे संत साहित्य काळाची गरज या विषयावर व्याख्यान पार पडले.

                      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सुशीला सुरवसे उपस्थित होत्या यावेळी संत साहित्य काळाची गरज या विषयावर बोलताना प्रा फटे म्हणाले की नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असे सांगून तेराव्या शतकापासून ते अलीकडच्या काळात संत गाडगेबाबा यांच्या कार्याची ओळख करून दिली.

                     संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम तसेच संत दामाजी,जनाबाई,बहिणाबाई यांच्या विविध साहित्याचे त्यांनी दाखले दिले तसेच संत साहित्याची गरज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध विश्वाला आहे असा संदेशही त्यांनी यावेळी दिला तर दुसरे वक्ते सुरेश पवार गुरुजी यांनी आपल्या व्याख्यानात संत गाडगे महाराज यांचे स्वच्छतेचे कार्य सांगून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले विद्यार्थ्यांनी ध्येयवादी बनले पाहिजे असे सांगून कोणतेच क्षेत्र वाईट नाही त्यामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करा असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

                     सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सिद्धनाथ फटे संभाजी चव्हाण वंदना यादव मुख्याध्यापक दौलतराव मासाळ शारदा काळुंगे अंगणवाडी सेविका प्रतिभा तोंडसे,सविता मेटकरी मनीषा पटेल यांचेसह कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ नवनाथ जगताप,प्रा डॉ दत्तात्रय गायकवाड,प्रा डॅा राजेश गावकरे,सर्व स्वंयसेवक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा शैलेंद्र मंगळवेढेकर यांनी केले तर स्वयंसेवक अंकुश वाघमारे याने आभार मानले.


test banner