प्रतिनिधी:-राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करत आज पहाटे त्याचा आध्यादेश काढण्यात आला.मराठा आंदोलकांचा मोठ्ठा विजय झाला आहे.
हे मराठा आंदोलनाचे मोठ्ठे यश मानले जात आहे.कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही देखील मागणी मान्य झाली असून सगे सोयरे याच्याबद्दल अध्यादेश काढण्यात आला आहे तो जरांगे पाटील यांना देण्यात आला आहे. यावेळी बोलताना पाटील यांनी सांगितले.
राज्यातील मराठी बांधव यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमण्यात येणार आहे.मराठवाड्यात कमी प्रमाणात पत्र सापडले त्या बाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून काम करणार आहे.
तसेच विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे आमचे आरक्षणाचे काम केले आहे,असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
ते पुढे बोलताना ते म्हणाले समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे.आज सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावले आहे.आज आम्ही येथे सभा घेणार आहे मुंबईत जाणार नाही.
अनेक दिवसांपासून सुरू असणारे मराठा आंदोलन आता संपल्यामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
राज्य सरकारने मनोज जरांगे यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून पहाटे अध्यादेश काढले आसुन आपल्या लढ्याला मोठ्ठे यश मिळाले आहे.
आज सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थित आपली विजयी सभा परा पडणार आहे.या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.