आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्यानंतर मंगळवेढा मध्ये विजयी जल्लोष. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्यानंतर मंगळवेढा मध्ये विजयी जल्लोष.

 
                   मंगळवेढा:-मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाले आसता.मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मगण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत.

                 ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आंतरवली ते मुंबई या दरम्यान आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वखाली झालेले आंदोलन यशस्वी ठरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजात सर्व मागणी मान्य केल्यामुळे मंगळवेढा येथे दामाजी चौकात फटाके फोडून गुलालाची उधळण करण्यात आली.

                   सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणाऱ्या आत्तापर्यंत या सर्वच पक्षाचे सत्ताधाऱ्यांनी मात्र सत्तेवर येताच आरक्षणाच्या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे समाजाला अखेर रस्त्यावर उतरण्या शिवाय पर्याय राहिला नाही.

                  मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही मागणी सुरुवात केल्यापासून अंतरवाली सराटी येथे झालेल्या पोलीस लाठी हल्ल्यानंतर मंगळातील सकल मराठा समाजाच्या भावना अधिक तीव्र झाल्यानंतर रस्ता रोको आंदोलन,मुंडन आंदोलन, सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, एसटी बस वरील सरकारी जाहिरातीमधील राजकीय नेत्यांना काळे फासणे या वेगवेगळ्या माध्यमातून मंगळवेढ्यात आंदोलन करत सरकारला आपल्या भावनांची तीव्रता दाखवण्यात मंगळवेढ्यातील सकल मराठा बांधव यशस्वी ठरले होते.

                  अंतरवाली सराटी ते मुंबई दरम्यान आंदोलनामध्ये रांजणगाव ते लोणावळा यादरम्यान मंगळवेढ्यातील संदीप फडतरे,प्रकाश मुळीक,प्रदीप घुले,संतोष नागणे यांच्यासह भाळवणी,डोंगरगाव,मारापुर,मरवडे,आंधळगाव,भोसे येथील काही बांधव उपस्थित होते.

                 आज पहाटेच्या दरम्यान या मागण्या मान्य झाल्यामुळे आज सकाळी दामाजी चौकात फटाके फोडण्यात आले व मराठा बांधवांनी उधळला व शहरातून हलव्याच्या आवाजात मिरवणूक काढत आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा जयजयकार करण्यात आला.


test banner