श्रम संस्कारातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होता - डॉ राजेंद्र वडजे. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २८ जानेवारी, २०२४

श्रम संस्कारातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होता - डॉ राजेंद्र वडजे.

           


                  मंगळवेढा:-श्रम संस्कारातूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होत असतो असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.राजेंद्र वडजे यांनी व्यक्त केले.

                  ते श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या मौजे फटेवाडी ता मंगळवेढा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरात दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी व्यक्तीमत्व विकास या विषयावर बोलत होते.

                 श्रमाचे संस्कार करण्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो.यावेळी गावचे प्रथम नागरिक सीमाताई काळुंगे,पोलीस पाटील,सुरेश वाडदेकर,चंद्रकांत लेंडवे,दत्तात्रय चव्हाण,उद्योजक प्रकाश काळुंगे,शिवाजी माने यांचेसह राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.राजेश गावकरे,प्रा. शैलेंद्र मंगळवेढेकर,प्रा.संजय क्षिरसागर,प्रा.प्रशांत धनवे,प्रा.एस के राठोड,प्रा.समाधान नागणे,प्रा. बाळकृष्ण माळी,प्रा.आनंद साळवे,प्रा.बापू इंगळे,प्रा.एस एन पवार, प्रा.दादासाहेब देवकर,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

               सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शैलेंद्र मंगळवेढेकर यांनी केले तर आभार स्वयंसेविका कोमल बनसोडे हिने मानले.


test banner