श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या पशु चिकित्सा शिबीरात ३५० जनावरांची तपासणी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २८ जानेवारी, २०२४

श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या पशु चिकित्सा शिबीरात ३५० जनावरांची तपासणी.

       


                     मंगळवेढा:-श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरात मौजे फटेवाडी येथे दिनांक २७ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या पशुचिकित्सा शिबीरात ३५० जणावरांची तपासणी करण्यात आली.

                     यावेळी पशु चिकित्सा अधिकारी डॉ रवींद्र बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली जनावरांची तपासणी करून जनावरांना बिल्ले लावण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ एन आर जगताप,डॉ आर बी गावकरे  डॉ डी एस गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा शैलेंद्र मंगळवेढेकर आदी उपस्थित होते.

                    सदर पशु चिकित्सा कार्यक्रम पार पडण्यासाठी कनिष्ठ विभागाचे प्रा देवकर डी एम सर व प्रा पाटील एस टी प्रा राठोड एस के डॅा बाळकृष्ण माळी इत्यादी प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. दुपारच्या सत्रामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विविध कला गुणदर्शनांचे सादरीकरण केले.

                    यावेळी फटेवाडी येथील समस्त ग्रामस्थांचे मनोरंजन झाले सदर कार्यक्रमास फटेवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सदर कार्यक्रमात स्वयंसेवकांनी पथनाट्य,भारुड, देशभक्तीपर गीत,जनजागृती कार्यक्रम इत्यादी कलाप्रकार सादर केले.

                     तसेच आपल्या सादरीकरणातुन समाजातील सर्व स्तरातील लोकांचे मनोरंजन व जनजागृती केली सर्व ग्रामस्थांनी सदर कार्यक्रमास भरभरून दाद दिली विविध कला गुण दर्शनात जिल्हा परिषद मराठी शाळा यांच्यातील बालकलाकारांनी आपली कला सादर केली. सदर बालकलाकारांनी आपल्या विविध कला गुणदर्शनांनी ग्रामस्थांची मने जिंकली तसेच बालकलाकारांच्या पालकांनी देखील उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे आपल्या चिमुकल्यांचा कोड-कौतुक केले.

                    विविध कलागुण दर्शन कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापिका वंदना बिले मॅडम,सहशिक्षक दौलतराव मासाळ देखील उपस्थित होते सदर विविध कलागुण-दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी श्री बाळु चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.


test banner