संवाद टीम
कुरीयस कीड , इंटरनॅशनल प्रीस्कूल आयोजित तसेच मलबार गोल्ड आणि डायमंड यांच्या संयुक्त विद्यमाने "ग्लाॕम ऑफ सोलापूर" या स्पर्धेचे आयोजन सोलापूर जिल्हास्तरावर करण्यात आले होते.
ही स्पर्धा विविध वयोगटातून घेण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धेत सोलापूर शहर व जिल्ह्यातून दोनशे स्पर्धकांनी भाग घेतला होता. बेस्ट रॅम्प वॉक, कॉन्फिडंट, टॅलेंट यावर आधारित गुणदान करून परीक्षकांनी विजेत्यांची निवड केली. आठ ते अकरा वयोगटातून मंगळवेढ्याची कु. नियती नागेशकुमार धनवे ला ग्लाॕम ऑफ सोलापूर" मधील बेस्ट कॉन्फिडन्ट हा बहुमान मिळाला. हा बहुमान मिळवणारी या वयोगटातील मंगळवेढ्यातील ती पहिली मुलगी ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल मंगळवेढा शहर परिसरातून कौतुक होत आहे.