शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अरळी येथे कट्टे कृषी उद्योग समूहाच्या नवीन दालनाचा शुभारंभ. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अरळी येथे कट्टे कृषी उद्योग समूहाच्या नवीन दालनाचा शुभारंभ.

 


                  मंगळवेढा - अरळी (ता. मंगळवेढा ) येथे कट्टे कृषी उद्योग समुहाच्या नवव्या कृषी सेवा केद्राचे उद्घाटन श्री पूज्य घोळेश्वर महाराज उंब्रज,श्री पूज्य नुरदय्या हिरेमठ उंब्रज यांच्या हस्ते करण्यात आले, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शिवाजीराव काळुंगे होते. 

                 यावेळी व्यासपिठावर दामाजी कारखाना चेअरमन शिवानंद पाटील, कट्टे कृषी उद्योग समुहाचे अध्यक्ष संजय कट्टे , रमेश भांजे, मल्लिकार्जुन भांजे, सरपंच मलसिद्ध कुंभार, शेतकरी संघटना अध्यक्ष सिद्धेश्वर हेंबाडे आणि राहुल घुले, राजमानेसो आणिॲग्रीकॉस एस्पोर्ट्सचे टेक्नीकल डायरेक्टर अजय आदाटे , अंकुष पडवळे, दत्तात्रय खडतरे, युवराज कलुबम्रे, ओंकार धनवे आदी उपस्थित होते.

              यावेळी शिवाजीराव काळुंगे यांनी आपल्या भाषणात शेतकरी व शेती अडचणीत असून शेती फायद्यात आणण्यासाठी शेतकर्यांना पीक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी ऊस शेतीने आजवर शेतकर्यांना मान सन्मान मिळवून दिला. मात्र सध्या उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत आहे. 

            त्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. उत्पन्न घटल्यामुळे ऊस शेतीने दिलेला मान - सन्मान कोणीतरी हिरावून घेतला की काय असेच वाटु लागले आहे. म्हणून ऊस उत्पादक शेतकयां नी आता जमिनीचा सेद्रिय कर्ब वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. जमिनीचा सेंद्रीय कर्ब वाढवण्यासाठी विविध प्रयोग करावेत.

            हे करत असताना ॲग्रीकॉस कंपनीच्या तंत्रज्ञानाचा फायदा करून घ्यावा. ॲग्रीकॉस कंपनीने आता माती व पाणी तपासण्या ची लॅब सुरू केली आहे. त्यामध्ये आपल्या शेतातील माती व पाणी तपासून योग्य मार्गदर्शन केले जाईल. त्याचा फायदा आपल्याला पुढच्या पिकासाठीचे नियोजन करणे सोपे जाईल. लकी ड्रॉ पद्धतीने पहिल्या ५ शेतकऱ्यांना ॲग्रीकॉस कडून ऊस फवारणी साठीचा  नवीन "जॅम - एक्स" चा फॉर्म्युला देण्यात आला. आभार राजेंद्र जाधव सर यांनी मानले.



test banner