इंग्लिश जुनिअर कॉलेजच्या आमन शेख या विद्यार्थ्याला स्पर्धेत सुवर्णपदक - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

इंग्लिश जुनिअर कॉलेजच्या आमन शेख या विद्यार्थ्याला स्पर्धेत सुवर्णपदक

 


                       प्रतिनिधी:१ ते ५ नोव्हेंबर २०२३ या दरम्यान डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया संलग्न गुरुनानक इंग्लिश स्कूल शिवपुर वाराणसी व वाराणसी डॉजबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित ८ व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर अजिंक्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्र  डॉजबॉल असोसिएशनच्या मुला मुलींनी महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले.

                   त्या महाराष्ट्राच्या संघामध्ये मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी अमन इसाक शेख या विद्यार्थ्यांने इंग्लिश स्कूलला सुवर्णपदक मिळवून दिले.

                 या स्पर्धेमध्ये मुलांच्या संघाने सुरुवातीपासून एक ही मॅच न हरता अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. त्यामध्ये मुलांच्या संघाने कर्नाटकच्या संघावर मात करून विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.

                या विजयाने इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी अमन शेख या विद्यार्थ्याचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्याच्या या विषयांमध्ये त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहित करणारे त्याचे क्रीडाशिक्षक शिनगारे सर,अण्णा वाकडे व अमित जावळे यांचे ही मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षक नवनाथ लोहार व कोच फिरोज पठाण यांचेही कौतुक होत आहे.

                यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. सुजित बापू कदम, शिवशंभू महिला पतसंस्थेच्या चेअरमन तेजस्विनीताई कदम मॅडम, सर्व शिक्षक वृंद आदींनी या अमन शेख याचे अभिनंदन केले.


test banner