प्रतिनिधी:
मराठा आरक्षणा बद्दल वातावरण तापलेले आहे. मात्र यावर आज मनोज जरांगे पाटील यांनी आज मोठ्ठं वक्तव्य केलं आहे.
त्यामधे काहींनी फक्त नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.
यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की ओबीसी आरक्षणामध्ये ज्या काही सुविधा आहेत,त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देताना आम्हाला मिळाल्या पाहिजेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की आमचं जे काही हक्काचं आहे ते आम्हाला मिळणारच आहे.त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका जाहीर करावी त्यांचा विरोध नेमका कश्याला आहे. असे उत्तर त्यांनी त्यांना मराठा आरक्षण घेताना त्यात राजकीय आरक्षण घ्यायचं की नाही या प्रश्नाला दिले.
आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी आसल्याने ओबासी चे सर्व हक्क आम्हाला मिळणार आहेत.आमचं जे काही हक्काच आहे ते मिळणारच आहे त्यामुळे आम्ही का सोडायचं कोणत्या कारणासाठी विरोध होत आहे त्यांनी ते स्पष्ट करावं.
जे आमचं आहे ते,ते सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे. जे ओबीसींच्या हक्काचा आहे ते सर्व काही आम्हाला मिळाले पाहिजे असे जरांगे पाटील बोलताना म्हणाले.