मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचेतींमध्ये कुणाचा सत्ता बदल तर कोण कोण झाले सरपंच. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०२३

मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचेतींमध्ये कुणाचा सत्ता बदल तर कोण कोण झाले सरपंच.

 


                       मंगळवेढा:मंगळवेढा मध्ये झालेल्या २५ ग्राम पंचायत निवडणुकी मध्ये १९ ग्रामपंचायती वरती सत्ता बदल झालेला दिसून आला आहे.

                     यामध्ये प्रशांत परिचारक गटाकडून २१ आ.समाधान आवताडे गटाकडून २०,बबनराव आवताडे गटाकडून१५,भालके गटाकडून १५ ग्रामपंचायती वरती दावा केला जात आहे.

                    मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणीचे नियोजन तहसीलदार मदन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य पद्धतीने केले. मंगळवेढा येथील शासकीय गोडावून मध्ये सकाळी ८ च्या सुमारास मतमोजणीस सुरुवात झाली.मत मोजणी साठी १५ टेबलच्या माध्यमातून ७ फेऱ्या करण्यात आल्या. साधारतः १२ च्या सुमारास ही मतमोजणी संपली.

                     तर काही निकाल हाती येऊ लागल्यानंतर कार्यकर्ते मध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले.काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी तर काही ठिकाणी गुलालाची उधळण करण्यात आली.

                  तर काही ठिकाणी ग्रामपंचायती मध्ये सत्ता परिवर्तन झालेले दिसून आले.

                प्रत्येकजण आपला आपला गड राखण्यात यशस्वी झाला.काही ग्रामपंचायती वरती युवकांना संधी मिळाली तर काही ग्रामपंचायती मध्ये जुनी असणारी सत्ता मोडीत काढून नवीन आघाडी स्थापन करण्यात यशस्वी झाले.

      विजयी सरपंचांचे व सदस्यांचे सत्कार व अभिनंदन करण्यात आले.

     निवडून आलेले सरपंच.

बठाण- पूजा कोडगर,देगाव- बालिका ढेकळे, जालीहाळ-कृष्णाबाई चौगुले,लक्ष्मी दहिवडी-अनिल पाटील,आंधळगाव-लव्हाजी लेंडवे, डिकसळ-सारुबई लांडगे, खूपसंगी- अनुराधा पडवळे, निंबोणी-बिरू घोगरे.

जुनोणी- दत्तात्रय माने,लोणार- म्हांतेश बिराजदार, पडोळकरवाडी- सुनीता पडोळकर, शेलेवाडी-सुनिता माळी, रड्डे-सरस्वती थोरबोले,अकोला-सुलोचना इंगळे.

    

       भाळवणी-लक्ष्मण गायकवाड, मुंढेवाडी-अरुण जावळे, उचेठाण-भाग्यश्री कोळी, मानेवाडी-शिवाजी मिटकरी, जंगलगी-आमसिद्ध चौखंडे,शिरसी-बाबासाहेब कसबे, रेवेवाडी-सुनीता रेवे, खडकी-संजयसिंग राजपूत, चिक्कलगी-ललिता ऐवळे, महमदाबाद-छाया मिस्कर, नंदुर-सुमन गोडसे.
test banner