मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायती वर आमदार समाधान दादाचं वर्चस्व कायम. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायती वर आमदार समाधान दादाचं वर्चस्व कायम.

   


  

                 

                       मंगळवेढा:मंगळवेढा २७ ग्रामपंचायती मधील झालेल्या निवडणुकी मध्ये मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांच्या गटाने २७ ग्रामपंचायती मधील १३ ग्रामपंचायत वरती एक हाती वर्चस्व राखत गुलाल उधळला आहे.

                                                                                                    तर आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वा मध्ये देगाव,जूनोनी,अकोले,बठान,उचेठाण,महमदाबाद,जंगलगी,मुंढेवाडी,लमाणतांडा,लक्ष्मी दहिवडी ,नंदूर, हिवरगाव, निंबोणी या ग्रामपंचायती वर सत्ता स्थापन केली.

              तर खडकी,शेलेवाडी, भाळवणी,खुपसंगी, रड्डे, जालिहाळ,ब्रम्हपुरी या ७ ग्रामपंचायती वरती आ.आवताडे यांच्या गटातील उमेदवारांनी स्थानिक  आघाड्या बनवून सदस्य पदावरती आपले नाव कोरली आहेत.

               यामध्ये सर्व विजयी उमेदवारांचे आमदार समाधान आवताडे यांच्या मंगळवेढा येथील जनसंपर्कलया मध्ये मार्केट कमिटीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते व जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये  सत्कार करण्यात आला.  

             त्यावेळी मरापुरचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव, माजी संचालक पप्पू काकेकर,विजय माने भारत निकम,सरपंच शिवाजी सरगर आदी मान्यवर उपस्थित होते.



test banner