पश्चिम महाराष्ट्रात सापडले कुणबी दाखले,मनोज जरांगे पाटील यांचा दावा खरा ठरला. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३

पश्चिम महाराष्ट्रात सापडले कुणबी दाखले,मनोज जरांगे पाटील यांचा दावा खरा ठरला.

   


         

                  मराठा आरक्षण आंदोलन राज्यभरामध्ये सुरू असताना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आलेली आहे.

                 आता पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात कुणबी दाखले सापडू लागले आहेत जुने रेकॉर्ड तपासत असताना सोलापुरातील भोसे या गावात कुणबी दाखल्यांची नोंद असल्याचे समोर आले.

                मनोज जरांगे पाटील यांनी केलेला कुणबी दाखल्यांच्या पुराव्यांच्या आधारे राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले द्या हा दावा खरा ठरताना दिसत आहे.

               जुने रेकॉर्ड तपासताना पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावात 25 पेक्षा जास्त दाखले सापडले आहेत. या दाखल्यातून मराठा कोणते असल्यास स्पष्ट झाला आहे. जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर रेकॉर्ड तपासताना भोसे सारख्या लहानशा गावात हे दाखले आढळून आले.

                पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावातील शाळेत 1885 पासूनचे रेकॉर्ड सापडले आहे. 800 ते 190 या काळातील दाखले मोडी लिपीत तर त्यानंतर मराठीमध्ये सापडले.

               या सापडलेल्या दाखल्यामुळे मनोज जरांगे पाटील सातत्याने जो दावा करत आहे तो दावा खरा ठरताना दिसत आहे.

              राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले द्या अशी मागणी  मराठवाड्यातील कुणबी दाखल्याच्या पुरावाच्या आधारे मनोज जरांगे पाटील हे करत आहेत. यासाठी सरकारने एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे.

                      मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला गुरुवारपर्यंतचा अल्टिमेट दिला आहे. गुरुवारी कोणत्याही प्रकारचा निर्णय न झाल्यास त्यांनी जल त्याग करण्याचा इशारा सरकारला दिला आहे.


test banner