कौतुकास्पद!संतनगरीतून वारी परिवाराचे सायकलस्वार रायगडकडे रवाना. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०२३

कौतुकास्पद!संतनगरीतून वारी परिवाराचे सायकलस्वार रायगडकडे रवाना.                         मंगळवेढा:दुर्गराज रायगड संवर्धन व पर्यटन विकास जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या मंगळवेढा ते रायगड ऐतिहासिक सायकल मोहिमेसाठी  गुरूवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी संतनगरीतून वारी परिवाराचे सायकलस्वार रायगडकडे रवाना झाले.

                        सुरवातीस शिवालयातील शिवमुर्तीचे पूजन करण्यात आले चार दिवसाच्या ऐतिहासिक सायकल मोहीमेत पंढरपूर-वेळापूर-माळशिरस-नातेपूते-फलटण-शिरवळ-भोर-वरंध-महाड-पाचाड-रायगड या मार्गावरती गडकोट स्वच्छता व संवर्धन विषयी जनजागृतीपर पत्रके वाटण्यात येणार आहेत.

         


                      पाचाड याठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंच्या समाधीस्थळी पूजन करून दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच रायगडावरील जगदीश्वर मंदीर,बाजापेठा,छत्रपती शिवरायांची समाधी,राजवाडा,वाडे,महादरवाजा,शिरकाई मंदीर,राजदरबार,अष्टप्रधान वाडे व सप्त मंजिली बुरुज आदि ठिकाणांना भेटी देऊन तरूणांना वैभवशाली इतिहासाची ओळख करून दिली जाणार आहे.

                      तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी देखील होळीच्या माळावर दिमाखात उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास साकडे घालण्यात येणार आहे. आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला हा महाराष्ट्राच्या देदिप्यमान इतिहासाचा अनमोल असा ठेवा आहे.

                    त्यामुळे या ऐतिहासिक अभिमानाच्या वारशाचे भावी पिढीसाठी जतन व्हावे तसेच शिवकाळात जसा रायगड होता तसाच रायगड पुन्हा एकदा सर्वांना याची देही याची डोळा पाहता यावा त्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून समग्र विकास व्हावा यासाठी मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबकडून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा देखील केला जाणार आहे


                   ऐतिहासिक सायकल मोहीमेत सुहास ताड,चंद्रकांत शहा,दत्तात्रय आसबे, सिद्धेश्वर डोंगरे,पवन टेकाळे,समर्थ महामूनी,रोहन सुर्यवंशी,भारत नागणे गणे, स्वराज कलुबर्मे,सौरभ मुढे,हर्षद वस्त्रे,संजय जावळे,रोहित वाघ,पांडूरंग कोंडूभैरी,प्रा विनायक कलुबर्मे आदी सायकलस्वार सहभागी झालेले असुन सदर सायकल मोहीमेकरीता जगदंबा परिवाराचे अध्यक्ष चंद्रकांत घुले,शिर्के मल्टीस्पेशीलीटी हॅास्पिटलचे डॅा शरद शिर्के, श्री समर्थ हॅास्पिटलचे डॅा नितीन आसबे,ट्रॅव्हल्स ग्रूपचे अविनाश चेळेकर,संजय डांगे,सचिन आवळेकर व सप्तशृंगी नवरात्र मंडळाचे माजी अध्यक्ष नागेश डोंगरे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.यावेळी अजित जगताप, राजेंद्र मेढे,विजय पवार,राजेंद्र गायकवाड,राजाराम सूर्यवंशी,प्रकाश मुळीक,विलास अवताडे,शिवाजी वाकडे ,महेश वाकडे उपस्थित होते.test banner