मनोज जरांगे पाटील यांच्या झंझावती महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०२३

मनोज जरांगे पाटील यांच्या झंझावती महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात.

 


                        मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबर पर्यंत वेळ उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकला दिला आहे.

                      हॉस्पिटल मधून त्यांना सोडण्यात आल्या नंतर ते पुन्हा महाराष्ट्राचा झंझावती दौरा करणार आहेत.त्यामधे ते आपल्या दौऱ्याची सुरुवात सोलापूर जिल्ह्यामधून मधून करणार आहेत.

                     तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी या गावी( नंबर 1)  या ठिकाणी जरांगे पाटील यांची भव्य सभा होत आहे.या सभेसाठी जवळपास १२५ एकरमध्ये नियोजन करण्यात आले आहे.

                  या सभास्थळाची पाहणी सकल मराठा समाजाच्या वतीने देखील करण्यात आली आहे.तर या सभेसाठी सोलापूर जिल्ह्यातील अनेक मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याचे आयोजांकडून सांगण्यात आले आहे.

                  या सभेच्या ठिकाणी मराठा बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची,डॉक्टर आणि रुग्णवाहिका यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

                 करमाळा तालुक्यातील ही सभा संध्याकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

                 मंत्री छगन भुजबळ,विजय वडेट्टीवार असे अनेक ओबीसी नेते त्यांच्या निशाण्यावर वरती आहेत.

                 सोलापूर जिल्ह्यातील सभेमध्ये मनोज जरांगे पाटील हे काय बोलणार याच्या कडे  सर्वांचे लक्ष्य लागून राहिलेले आहे.



test banner