फसव्या जाहिरातीवरून पंतप्रधान,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्याच्या फोटोला कलर फासला. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

फसव्या जाहिरातीवरून पंतप्रधान,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्याच्या फोटोला कलर फासला.                  मंगळवेढा:मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आज मंगळवेढ्यातील सकल मराठा बांधवांच्या भावना आरक्षणासाठी तीव्र झाल्या एसटी वरील फसव्या जाहिरातीला कलर फासून निशेध व्यक्त केला.

                  सकल मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या अंतरवाली सराटी ता अंबड जि जालना येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ मंगळवेढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने दामाजी चौकात सुरू असलेला साखळी उपोषणाचा लढा अधिक तीव्र झाला.

                    याअगोदर सरकारला ४० दिवसाची मुदत दिलेली असताना देखील शासनाने दिलेला शब्द पाळला नाही. यासाठी पुन्हा एकदा शांततेच्या मार्गानेच लढ्यासाठी मराठा समाजाने कंबर कसली आहे कालपासून मंगळवेढा शहरात नियोजित केलेल्या रूपरेषेनुसार साखळी उपोषणात सकाळी १० ते २ व दुपारी २ ते सायं ६ या वेळेत  शहरातील प्रत्येक गल्लीतील मराठा बांधव आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आंदोलनात सहभागी झाले. 

           शासनाच्या आरक्षण देण्याच्या उदासिनतेबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी शहरात व गावागावांत कॅन्डल मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. एसटीवर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजने संदर्भातील जाहिरात असलेले एसटी दामाजी चौकातच बंद पडली त्या गाडीला धक्का देत केंद्र व राज्य सरकारच्या सत्ता राजकीय सत्ताधाऱ्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून आपले फोटो लावून विकासाच्या नावाखाली स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले आणि फसव्या जाहिरातीमधून समाजबांधवांची फसवणूक झाल्यावरून पंतप्रधान नरेद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या जाहीरातीवरील फोटोला रंग फासून निषेध व्यक्त केला. जाहिरातीमधील फोटोवर कलर फासला.दरम्यान माचणूर,रहाटेवाडी,भालेवाडी, लेंडवे-चिंचाळे व फटेवाडी या ग्रामपंचायतीने मराठा आरक्षणासाठी ठराव करण्यात आले.

-------

             रस्त्यात बंद पडणाऱ्या एसटी बसवर विकासाच्या जाहिरातीत छापून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या राज्यकर्त्यांनी अशा फसव्या जाहिराती बंद कराव्यात.

माऊली कौडूभैरी,आंदोलक, सकल मराठा आरक्षण समिती,


test banner