मंगळवेढयात आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषणाचा लढा तीव्र. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

मंगळवेढयात आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषणाचा लढा तीव्र.



                    मंगळवेढा:सकल मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या अंतरवाली सराटी ता अंबड जि जालना येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ मंगळवेढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने दामाजी चौकात सुरू असलेला साखळी उपोषणाचा लढा अधिक तीव्र करण्यात आला आहे.

       


          याअगोदर सरकारला ४० दिवसाची मुदत दिलेली असताना देखील शासनाने दिलेला शब्द पाळला नाही यासाठी पुन्हा एकदा शांततेच्या मार्गानेच लढ्यासाठी मराठा समाजाने कंबर कसली आहे कालपासून मंगळवेढा शहरात नियोजित केलेल्या रूपरेषेनुसार साखळी उपोषणात सकाळी १० ते २ व दुपारी २ ते सायं ६ या वेळेत मंगळवेढा शहरातील प्रत्येक गल्लीतील मराठा बांधव आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आंदोलनात सहभाग नोंदविणार आहेत.

                 तसेच ग्रामीण भागातही पक्ष गेला चुलीत व नेतेही गेले चुलीत,आरक्षण नाही तर कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश नाही अशा प्रकारचे बॅनर लावून उपोषणास जोरदार पाठिंबा मिळत आहे तसेच शासनाच्या आरक्षण देण्याच्या उदासिनतेबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी शहरात व गावागावांत कॅन्डल मोर्चा देखील काढण्यात येणार आहेत.तरी हक्काचे आरक्षण मिळविण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून साखळी उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाज मंगळवेढा तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.


test banner