मंगळवेढा:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मंगळवेढा-पंढरपूर दौऱ्यावर दि ६ ऑक्टोबर २०२३ रोजी येणार असून मंगळवेढा शहारा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर पहिल्यांदाच ते मंगळवेढा पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत.
तसेच मंगळवेढा तालुक्यातील टेंभू म्हैसाळ योजनेतील पाणी वितरण प्रश्न बाबत जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हुन्नूर ता.मंगळवेढा येथे शेतकरी संवाद व पाणी वितरण बाबत सविस्तर चर्चा सत्र होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते,श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे,तसेच राष्ट्रवादीचे शेखर माने,मंगळवेढा राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राहुल शहा,सहसचिव प्रदेश विजयकुमार खवतोडे,पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अध्यक्ष ॲड.दत्तात्रय पाटील,पंढरपूर मंगळवेढा कार्याध्यक्ष मुज्जमील काझी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील,शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, महिला तालुकाध्यक्ष संगीताताई कट्टे-पाटील