जयंत पाटील यांचा झंझावती पंढरपूर-मंगळवेढा दौरा,पाणी प्रश्न बाबत उर्वरित कामे पूर्ण करण्याचा दिला शब्द ,आपल्या हक्काच्या माणसाला अभिजीत पाटील यांना विधान सभेत पाठवण्याचे केले आवाहन . - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०२३

जयंत पाटील यांचा झंझावती पंढरपूर-मंगळवेढा दौरा,पाणी प्रश्न बाबत उर्वरित कामे पूर्ण करण्याचा दिला शब्द ,आपल्या हक्काच्या माणसाला अभिजीत पाटील यांना विधान सभेत पाठवण्याचे केले आवाहन .

          

     


            मंगळवेढा: राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर आज पहिल्यांदा जयंत पाटील यांचा पंढरपूर मंगळवेढा झंझावती दौरा पार पडला.

            त्यावेळी त्यांचे मंगळवेढा येथे जंगी स्वागत करण्यात आले.त्यांनतर संत दामाजी पंतांच्या पुतळ्याला हार घालून मंगळवेढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

            त्यांनतर पक्ष बळकटी साठी व पक्ष वाढीसाठी विविध पदांच्या निवडी घेण्यात आल्या.

           त्यामध्ये माणिक गुंगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस मंगळवेढा तालुका कार्याध्यक्ष पदी तर वैभव ठेंगील व सचिन वाडतीले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंगळवेढा शहर उपाध्यक्ष,बापूसाहेब वस्त्रे यांची कार्यकारणी सदस्य,आय्याज शेख यांची प्रसिध्दी प्रमुख,सुहास मुरडे यांची सरचिटणीस,सदाशिव माळी यांची कार्यकारणी सदस्य, अनवर मुल्ला यांची सरचिटणीस यांची निवड करण्यात आली.

        त्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील टेंभू म्हैसाळ योजनेतील पाणी वितरण प्रश्न बाबत जयंत पाटील यांचा अध्यक्षतेखाली हुन्नूर ता.मंगळवेढा येथे शेतकरी संवाद व पाणी वितरण प्रश्न बाबत चर्चा करण्यात आली.

       चर्चा मध्ये बोलताना ते म्हणाले की पाणी प्रश्ना बाबत उर्वरित कामे पूर्ण करण्याचा शब्द दिला.

                येथील ३५ गावाचा पाणी प्रश्न तक्तालिन स्व.आ.भारत नाना भालके नेहमी मांडायचे.या योजनेसाठी पाणी साठा परवाना कमी असल्याने महाविकास आघाडी काळात अतिरिक्त 1 टी.एम.सी पाणी उपलब्ध करून दिले.

             तसेच जत कालवा मंगळवेढा वितरीका १ व अन्य वितरिकांच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यातील ६००० हेक्टर क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला आसल्याचे ही तक्तालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.


                 पुढे बोलताना ते म्हणाले की अभिजीत पाटील येथे शेतकऱ्यांची जाण असणारे नेतृत्व यंदाच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना आपल्याला विधानसभेमध्ये पाठवण्याचे आवाहन मंगळवेढ्याच्या जनतेला केले.

          तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेत असताना मागील २.५ वर्षाच्या काळात योजनेला गती देण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी पक्षाने मागील १ वर्षाच्या काळात कोणतेही या योजनेसाठी ठोस काम केले नसल्याचे प्रामुख्याने दिसून येते.

        सध्याचे सरकार हे पालकमंत्री पद वाटपात अडकून आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले.

                त्यावेळी तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, निरीक्षक शेखर माने,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य राहुल शहा, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, नगरसेवक विजयकुमार खवतोडे, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, नूतन कार्याध्यक्ष माणिक गुंगे,डि.के.दत्तू,किसन गवळी,बजरंग भाऊ ताड,जमीर इनामदार,ज्ञानेश्वर(माऊली)कोंडुभैरी, सुहास मुरडे,अय्याज शेख,सदाशिव माळी, मुज्जमील  काझी,सागर केसरे,नागेश राऊत आदी.राष्ट्रवादी प्रेमी व कार्यकर्ते उपस्थित होते.


test banner