टीम संवाद न्यूज :
मराठ्यांना ओ बी सी मधून आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी उपोषण करून सरकारला एका महिन्याची मुदत देवून मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र भर एल्गार सभा घेत आहेत. आरक्षणासाठी मराठा समाज जागृत झाला आहे आणि त्यांना चांगला प्रतिसाद देत आहे. सरकारवर लवकर निर्णय घेण्यासाठी जनतेचा दबाव वाढत चालला आहे.
मंगळवेढ्यात गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 4.30 वाजता जाहीर सभा होणार आहे त्यापूर्वी शाहीर राजेंद्र कांबळे अकलूज यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे. तरी या सभेला मराठा बांधवांनी सहकुटुंब सामील होण्याचे आवाहन संयोजकानी केले आहे.
गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 4.30 वाजता
ठिकाण- आठवडा बाजार,शिवप्रेमी चौक,मंगळवेढा.
संयोजक- मंगळवेढा तालुका सकल मराठा समाज