सकल मराठा समाजाच्या वतीने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २९ ऑक्टोबर, २०२३

सकल मराठा समाजाच्या वतीने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन.



                  मंगळवेढा:मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी  मनोज जरांगे-पाटील यांनी गेली पाच दिवस अन्न पाण्याविना तसेच वैद्यकीय उपचार नाकारत आमरण उपोषण सुरू केलेले आहे.

                  आपला योद्धाच जर उपाशी असेल तर त्यांच्यासाठी व आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवेढा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवशीय अन्नत्याग उपोषण करण्यात आले तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल.

                   याची शासनाने दखल घ्यावी असे सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले.आंदोलनावरती सरकार कोणताही ठोस निर्णय घेत नसल्यामुळे, समाजाचा उद्रेक कोणत्याही क्षणी होऊ शकतो मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाची काळजी म्हणून मतदारसंघातील मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आमदार समाधान आवताडे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.तसेच आज तहसील कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांना अटकाव करून करून आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहावे.


test banner