श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी केली मंगळवेढा बसस्थानकाची स्वच्छता. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी केली मंगळवेढा बसस्थानकाची स्वच्छता.




                         मंगळवेढा:श्री संत दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन बी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता हीच सेवा या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजने मार्फत घेण्यात आलेल्या  स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवकांकडून मंगळवेढा बस स्थानक व आगाराची स्वच्छता करण्यात आली.


                   यामध्ये कनिष्ठ विभागाचे ५० विद्यार्थी तर वरिष्ठ विभागाचे ७५ विद्यार्थी असे एकुण १२५ विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवून स्वच्छतेचा नारा दिला यावेळी प्लास्टिक पिशव्या,खापरी पत्रे,गोळा करून परिसर स्वच्छ केला तसेच वाढलेले गवत,काटेरी झुडपे तोडून बसस्थानकातील खड्डे बुजविण्यात आले.


                याअगोदरही राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंगळवेढा बसस्थानक स्वच्छता करून अग्निशमनच्या सहाय्याने धुवून घेतले होते. महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्यांवर श्रमाचे संस्कार व्हावेत याकरिता महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कार्यरत असुन अनेक नवनवीन उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे.


                      यावेळी आगाराचे प्रमुख अधिकारी,उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड,वरिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ नवनाथ जगताप,डॉ दत्तात्रय गायकवाड,डॉ राजेश गावकरे कनिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा शैलेंद्र मंगळवेढेकर,सर्व प्राध्यापक व विद्यार्थी. उपस्थित होते.


test banner