महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगरपालिकेकडे नवीन अग्निशामकाची केली मागणी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगरपालिकेकडे नवीन अग्निशामकाची केली मागणी.

 


                           मंगळवेढा:महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहर राजवीर हजारे यांनी मंगळवेढ्याच्या विविध प्रश्नांची माहिती घेऊन व मंगळवेढ्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ती निवेदन देऊन त्यासंबंधी चर्चाही केली व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवीन अग्निशामकाची मागणी करून त्यासोबत अग्निशामक दलाची भरती प्रशिक्षण देऊन अग्निशामक दल स्वतंत्र करावं व अग्निशामक दलाच्या जागेत जे अभ्यासिका विद्यार्थ्यांची सुरू आहे.


                  त्यासंबंधी निवेदन दिले व त्याच विद्यार्थ्यांकडून अग्निशामक दलाच्या जागेवरती अभ्यासिका उभारली असून त्यांच्याकडून प्रत्येकी महिन्याला शंभर रुपये घेतले जात आहेत व त्यातूनच त्यांना चहापाण्याची सुविधा केली जाते परंतु स्वतंत्र अभ्यासिका असताना अग्निशामक दलाची जागेचा वापर केला जातोय व अग्निशामक नगरपालिके येथे लावून उभा असते व ते आता जुने झाले आहे. म्हणून आम्ही नवीन अग्निशामकाची मागणी केलेली आहे व शहरातील नगरपालिकेच्या शाळा असतील त्यांची झालेली अवस्था तिथे प्यायला लहान मुलांना पाणी सुद्धा नाही व पावसाळ्यात त्याची छत गळती याची दुरुस्ती लवकरात लवकर झाली पाहिजे ही मागणी आम्ही या निवेदनातून केलेली आहे.


                     दहा दिवसात च्या आत आम्हाला उत्तर पाहिजे असेही सांगितलेला आहे.अनेक प्रश्न आहेत तेही त्यांना सांगितले आहेत परंतु त्यातला महत्त्वाचे अजून दोन-तीन जे प्रश्न आहेत ते म्हणजे महिलांचे स्वच्छतागृह त्याच्या बाहेर पत्रा लावणे जेणेकरून स्वच्छतागृहाच्या समोर जे काही दुकान असतील व्यापारी असतील त्यांच्यामुळे महिलांना जाण्यास स्वच्छते बाथरूमला जाण्यास लज्जा वाटते त्यामुळे आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अशी मागणी केलेली आहे स्वच्छतागृहाच्या बाहेर बोराळे नाका येथे पत्रा लावणे हजारे गल्ली येथे पत्रा लावणे व कोंडूभैरी गल्ली च्या इथे पण पत्रा लावणे अशा या अजून भरपूर काही मागण्या आहेत.त्याही आम्ही लवकरात लवकर देणारच आहे परंतु या मागण्या मान्य करून घेऊन मग त्या दुसऱ्या मागण्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहे व त्यांच्या फॉलोअप घेऊन या तरी मागण्या लवकरात लवकर आम्ही त्यांच्याकडून करून घेऊ नाही त्यांनी केलं तर आम्ही आमच्या मनसे स्टाईल ने ते करून घेऊ त्यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.



                         माननीय श्री राजवीर हजारे शहर अध्यक्ष , शंकर गांडुळे तालुकाध्यक्ष, चंद्रकांत पवार जिल्हाध्यक्ष, देवदत्त पवार तालुका उपाध्यक्ष, मारुती वाघमारे रस्ते आस्थापना तालुका संघटक, विकास भोसले रस्ते अस्थापना शहर संघटक, युवराज चौगुले महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना तालुकाध्यक्ष,गोटू ओमने वाहतूक सेना शहराध्यक्ष प्रवीण कोंडके प्रवीण कोंडू भैरी, रवी कोरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष, सुनील कोरे,तेजस शिंदे गट अध्यक्ष, व सर्व मनसैनिक उपस्थित होते.


test banner