मंगळवेढा: मंगळवेढा व पंढरपूर मतदारसंघातील जनतेने अभिजीत पाटील यांच्या मागे खंबीरपणे ऐकपणाने उभे राहावे असे आवाहन राष्ट्रवादी चे संस्थापक शरद पवार यांनी केले आहे.
संतभूमी मंगळवेढा नगरीत शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दामाजी चौकात सत्कराप्रसंगी बोलताना म्हणाले.
त्यावेळी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील,रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा,धनश्री परिवाराचे संस्थापक काळूंगे सर,शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी,मुज्जमिल काझी,सुरेश कट्टे,जमीर इनामदार,रविराज मोहिते, सचिन वडतीले आदिजन उपस्थित होते.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की मंगळवेढा मतदार संघातील आत्ता पर्यंत रखडलेले प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहोत. त्यासाठी आपल्याला अभिजीत पाटील यांच्या मागे खंबीर पणे उभे राहण्याची गरज आहे असे आवाहन शरद पवार यांनी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की मंगळवेढा मतदार संघातील लोकांनी आज पर्यंत भरभरून प्रेम दिले आहे व पुढे ही असेच प्रेम द्यावे.
शरद पवार 12.15 च्या सुमारास शेतकरी हॉटेल पासून रॅली काढण्यात आली.ती रॅली दामाजी चौकामध्ये येऊन त्याठिकाणी पुष्वृष्टी करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
खा.शरद पवार हे ठरल्याप्रमाणे राहुल शहा यांच्या निवास स्थानी भेट देऊन पुढील कार्यक्रमा साठी रवाना झाले.