विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्री संत दामाजी महाविद्यालयात सज्ज :- डॉ पवार. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्री संत दामाजी महाविद्यालयात सज्ज :- डॉ पवार.





    मंगळवेढा:   विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्री संत दामाजी महाविद्यालयात सज्ज आहे असे मत प्राचार्य डॉ एन बी पवार यांनी व्यक्त केले ते श्री संत दामाजी महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातर्फे बीकॉम भाग एक मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या दिक्षारंभ समारंभात बोलत होते सुरवातीस सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.


                यावेळी पवार म्हणाले बीकॉम भाग एक मध्ये घेतलेला प्रवेश म्हणजे तुमच्या पदवीचा आरंभ आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात असलेल्या विविध सुविधांची व नियमांची माहिती व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आपल्या महाविद्यालयाला नॅक समितीकडून  B++ हे मानांकन मिळाले असुन सर्वच प्राध्यापक उच्चशिक्षित आहेत भव्य इमारत,क्रीडांगण,समृद्ध असे ग्रंथालय असुन ३२ हजारहून अधिक पुस्तके आहेत तसेच सुसज्ज कॉम्पुटर लॅब,लॅबोरेटरी असुन स्पर्धा परीक्षा विभाग,सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग,राष्ट्रीय सेवा योजना असे विविध विभाग कार्यरत आहेत विद्यार्थ्यांनी कौशल्याधिष्टीत बनावे यासाठी टॅली कोर्स,स्पोकन इंग्लिश कोर्स,अंगणवाडी व बालवाडी कोर्स सुरू आहेत तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व गरीब विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आर्थिक मदतही केली जाते तीन वर्षांमध्ये चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन एक सुसंस्कृत नागरिक बनावे व आई-वडिलांचे महाविद्यालयाचे,गावाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहनही डॉ पवार यांनी केले.


          कार्यक्रमासाठी बीकॉम मधील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा सरिता भोसले यांनी केले तर आभार प्रा प्रशांत धनवे यांनी मानले.


test banner