मंगळवेढा: मंगळवेढा येथील वारी परीवार या सामाजिक संस्थेच्या वतीने बोराळे नाका परिसरात असलेल्या तेली समाजाच्या स्मशानभूमीत ७७ वृक्षांचे रोपन करून ७७ वा स्वातंत्र्यदिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला याप्रसंगी वीरशैव समस्त तेली समाजातील ज्येष्ठांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले.
१५ ॲागस्ट रोजी वारी परिवाराने वृक्ष लागवड करून स्वातंत्र्यदिनादिवशी पर्यावरण रक्षणाचा एक आगळावेगळा संदेश समाजामध्ये दिला आहे. स्मशानभूमीत लावण्यात आलेल्या झाडांमुळे उन्हाळ्याच्या दिवसांत अंत्यविधीला आलेल्या नागरीकांना सावली मिळणार आहे याअगोदरही वारी परिवाराने डीवायएसपी कार्यालय येथे २२२ वृक्ष,सोलापूर रोडवरील स्मशानभूमी, मंगळवेढा-पंढरपूर हरीत पालखी मार्गावर वृक्ष लागवड करून संवर्धन करण्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे यावेळी झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा असा पर्यावरण रक्षणाचा जागर घालण्यात आला.
यावेळी उमाकांत चिंचकर,सोमनाथ आवताडे,दिगंबर यादव,बाबा कोंडुभैरी,दत्तात्रय भोसले,राहुल टाकणे,दत्तात्रय वरपे,दत्तात्रय घोडके,विद्यासागर देशमाने,दिलीप देशमाने,अशोक देशमाने,भारत देशमाने,अनुज नकाते,अमोल देशमाने,सिद्धेश्वर घोडके,ऋषिकेश चिंचकर,पोपट महामुरे,निलेश देशमाने,अजय अदाटे,परमेश्वर पाटील,सुमित गायकवाड,सुदर्शन ढगे,स्वप्नील टेकाळे,माणिक गुंगे,सुरेश माळी,रतिलाल दत्तू,रविकिरण जाधव,चंद्रकांत चेळेकर,पांडुरंग कोंडूभैरी,विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू आदीजण उपस्थित होते.