श्री संत दामाजी महाविद्यालयात डॉ एस आर रंगनाथन यांची जयंती साजरी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

संवाद न्यूज चॅनेल लवकरच

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयात डॉ एस आर रंगनाथन यांची जयंती साजरी.

              मंगळवेढा              :    श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ एस आर रंगनाथन यांची १३१ वी जयंती व ग्रंथपाल दिवस साजरा करण्यात आला.


            प्रथमता डॉ एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ एन बी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड,ग्रंथपाल प्रा नवनाथ बुरुंगले,ग्रंथालय लिपीक प्रियजीत आवळेकर,ग्रंथालय परिचर प्रसाद राजमाने यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.