हर घर तिरंगा या जनजागृती रॅलीत आ.समाधान आवताडे यांनी वाजविला झांज पथकातील ढोल - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२

हर घर तिरंगा या जनजागृती रॅलीत आ.समाधान आवताडे यांनी वाजविला झांज पथकातील ढोल


मंगळवेढा(प्रतिनिधी) स्वातंत्रयाचा अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील 60 हजार घरावर तिरंगा लावण्यासाठी आज प्रशासनाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली यामध्ये आ. समाधान आवताडे यांनी आपल्या कार्येकर्त्या समवेत ढोल वाजवत जनजागृती उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.

       


    यावेळी जिल्हाचे नेते  माजी आ.प्रशांत परिचारक उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर,तहसीलदार स्वप्नील रावडे, मुख्याधिकारी निशीकांत प्रचंडराव, गटविकास अधिकारी शिवाजी पाटील ,तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे ,धनश्री परिवाराचे शिवाजी काळुंगे भाजपा जिल्हा संघटनमंत्री शशिकांत चव्हाण,भाजपा तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल भाजपा ओ.बी.सी जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे,दामाजी शुगरचे संचालक औदुंबर वाडदेकर, दिगंबर भाकरे,अरुण किल्लेदार,राजेंद्र पाटील,महादेव लुगडे,सुरेश भाकरे,अॕड सुजित कदम,विजय बुरकूल,बाबा कौडुभैरी,महादेव जाधव,सुदर्शन यादव,दिगबर यादव आदी सहभागी झाले होते.          स्वातंत्राच्या अमृतमहोत्सानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र लढयाचे स्मृती तेवत राहव्यात.देशासाठी बलिदान दिले त्यांनी त्या अज्ञात,नायक,क्रांतीकारण यांचे स्वातंत्र संग्रामात घडलेल्या विविध घटनाचे स्मरण व्हावे,तसेच देशभक्तीची जाज्वल भावना,कायमस्वरुपी जनमानसात रहावी,देशाप्रती भक्तीसह कृतज्ञतेची जाणीव वृध्दीगंत व्हावी या उदेशाने मंगळवेढा शहर व ग्रामीण 13 ते 15 ऑगष्ट दरम्यान हे अभियान राबबिले जाणार आहे.त्यासाठी शहरातून 350 फुटाच्या तिरंगा ध्वजासह मान्यवर व विदयार्थ्यानी हातात तिरंगा घेत देशभक्तीपर गीते व घोषणा देण्यात आल्या.रॅलीत ढोलपथक,झांज पथक,एन.सी.सी,पतंजली योग समिती,वारी परिवार यांच्यासह शहरातील इंग्लीश स्कूल,दामाजी महाविदयालय,ज्ञानदीप विदयालय,नूतन मराठी विदयालय,महाराणी ताराबाई,जवाहरलाल हायस्कूल,मदनसिंह मोहिते पाटील महाविदयालय,दामाजी हायस्कूल,या शाळेतील 3500 विदयार्थ्यानी सहभाग नोंदविला.रॅलीत आ समाधान आवताडे हे ढोलपथकात सहभागी होत स्वत ढोल वाजवत स्वतमधील तरुणाई जागृत केली इंग्लीश स्कूलपासून सुरु झालेली रॅली नागणे गल्ली,खंडोबा गल्ली,बोराळे नाका,काझी गल्ली ,हजारे गल्ली,मुरलीधर चौक,चोखोमळा चौक,शिवप्रेमी चौक,दामाजी चौकात समारोप झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा