मंगळवेढा(प्रतिनिधी) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मंगळवेढा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध राजकीय पक्ष, संस्था-संघटनांच्या वतीने साठेंनगर येथे अण्णा भाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गर्दी करण्यात आली होती. या निमित्ताने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिर , आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
आमदार समाधान दादा अवताडे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे हे कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर झगडले त्यांनी बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडली असे आ समाधान आवताडे म्हणाले.
यावेळी अभिवादन करण्यासाठी माजी नगराध्यक्ष भारत नागणे, नगरसेवक प्रवीण खवतोडे ,राहुल वाकडे दामाजी शुगरचे माजी संचालक लक्ष्मण जगताप ,युवा नेते विक्रम शेंबडे, गणेश धोत्रे जयंती उत्सव मंडळाचे नूतन अध्यक्ष निखिल भंडारे ,माजी नगरसेवक मल्हारी कांबळे विक्रम अवघडे भगवान अवघडे सुभाष भंडारे प्रकाश खंदारे अशोक खंदारे नवनाथ अवघडे,जनार्धन अवघडे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन जनार्धन अवघडे यांनी केले.