अनवली ग्रामपंचायतीचा ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत समावेश! आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीला यश! पाणीपुरवठा कामाची टेंडर प्रक्रिया सुरू! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२

अनवली ग्रामपंचायतीचा ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत समावेश! आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीला यश! पाणीपुरवठा कामाची टेंडर प्रक्रिया सुरू!

 


पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील मौजे अनवली गावचा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता  यांच्याकडे केली होती. याबाबत वरील योजनेच्या कामाबाबतचे मंजुरीचे पत्र आमदार समाधान आवताडे यांना प्रशासनाकडून पाठवण्यात आल्याने पंढरपूर तालुक्यातील अनवली ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. याबाबतचे टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून येत्या काही दिवसातच पाणीपुरवठ्याचे काम केले जाणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.


पंढरपूर तालुक्यातील अनवली या ग्रामपंचायत मधील सर्व गावठाण, वाडी- वस्ती व सर्व गावची पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मौजे अनवली गावचा समावेश ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत करण्याची मागणी आमदार समाधानदादा अवताडे प्रतिष्ठानचे अमीन शेख यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या कडे  केली होती . 


याबाबत संबंधित प्रशासनाने अनवली गावचा ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत समावेश केल्याचे पत्र आमदार आवताडे यांच्या कार्यालयाला पाठवण्यात आले आहे.  यामुळे अनवली ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न काही दिवसातच सुटणार असल्याचे दिसून येत आहे.

test banner