मंगळवेढा(प्रतिनिधी) गळीत हंगाम 2022-23 साठी आवताडे शुगर कारखान्याच्या मिल रोलर पूजन मंगळवेढा मार्केट कमिटीचे माजी सभापती मा. विष्णुपंत आवताडे यांचे शुभहस्ते धार्मिक विधी करून करण्यात आले. नुकतेच अध्यक्ष संजय आवताडे यांचे हस्ते पहिला वाहन करार करून तोडणी वाहतुकीच्या कराराचा शुभारंभ करण्यात आला आहे. कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने दुसरे पाऊल म्हणून मिल रोलरचे पूजन करण्यात आले असून आक्टोबर मध्ये कारखाना सूरू होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहन पिसे यांनी दिली.
आवताडे शुगर सुरू करण्याच्या दृष्टीने अध्यक्ष संजय आवताडे यांचे मार्गदर्शनानुसार कारखान्याची ओव्हर ऑईलिंगची कामे जलद गतीने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज मिल रोलरचे पूजन करून सुरुवात केली आहे दोन वर्षापासून हा कारखाना बंद होता नुकताच आवताडे उद्योग समूहाने हा कारखाना ताब्यात घेतला असून कारखाना लवकरच सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर कारखान्याची कामे सुरू आहेत
या मिल रोलर पूजना वेळी श्री संत दामाजी कारखान्याचे संचालक अशोक केदार, दामाजी शुगरचे माजी मिस्टर संचालक प्रमोदकुमार म्हमाने, भारत निकम, अशोक भिंगे, बापूराया चौगुले (सावकार), शिवाजी मोहिते, दादा ओमने, कैलास कोळी, धनंजय खवतोडे, वि. से. सो. नंदुरचे चनबसू येनपे, नंदुरचे उपसरपंच परमेश्वर येनपे, अजित मोहिते, श्याम पवार, रहाटेवाडीचे सरपंच गोपाळ पवार, उमेश आवताडे, रमेश पवार, मोहन पवार, सागर सिद्ध, काशिनाथ पवार, आदी मान्यवर उपस्थित होते..