प्रतिनिधी :
पंढरपूर मंगळवेढा
विधानसभा पोटनिवडणूकीला सामोरे जाताना कॉँग्रेस पक्षाने मंगळवेढा शहर अल्पसंख्यांक
पदी श्री. रमीजराजा मुल्ला यांची निवड केली
आहे. भगीरथ दादांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कॉँग्रेस आमदार प्रणिती ताई शिंदे
स्वत: हजर होत्या. महाविकास आघाडीच्या
भगीरथ दादाना जिंकवण्यासाठी कॉँग्रेस सक्रिय
झाली आहे. युवा चेहऱ्याला मतदार संघातील अल्पसंख्यांक मताची मोट बांधण्याची जबाबदारी
दिली आहे.
विविध सामाजिक कार्यामध्ये रमिजराजा मुल्ला हे धडाडीने
काम करत असतात. तालुक्यातील ग्रामीण भागात सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्यासाठी
प्रयत्न केले आहेत. खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट च्या मध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र
आणून रक्तदान शिबिर, खतणा कॅम्प आयोजित केले आहेत. त्यांचा मित्रपरिवार ही खूप मोठा
आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत सलोख्याचे संबंध असल्यामुळे त्याचा फायदा नक्कीच
पक्षाला मिळणार आहे.
अल्पसंख्यांक मतदार हा शहरातील मत टक्केवारीत महत्वाची
भूमिका बजावतो. त्यातच जनाधार असेलेले पदाधिकारी नेमने फार गरजेचे होते. कॉंग्रेस कार्यकारणीने
यावेळी तेच केले. कॉँग्रेस च्या या खेळीमुळे भगीरथदादा भालके यांना नक्कीच फायदा
होणार आहे. जनसंपर्क असलेल्या रमिजराजा मुल्ला यांची निवड कॉँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी
नक्कीच होईल असे मत कॉँग्रेस जिल्हा सरचिटणीस श्री. फिरोज भाई मुलाणी यांनी व्यक्त केले.