भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बंडखोरी शांत करणे हेच मोठे आव्हान! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बंडखोरी शांत करणे हेच मोठे आव्हान!



नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या पतीचे उमेदवारी भाजपासाठी  तर सिद्धेश्वर आवताडे यांची उमेदवारी राष्ट्रवादीसाठी फायद्याचे अशी चर्चा मतदारांत!मंगळवेढा(प्रतिनिधी) भारत भालके यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी एकूण 38 जणांनी 44 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही बाजूने बंडखोरीने जोर धरला आहे. भाजपला काल याची मोठी लागण झाली असून परिचारक गटाचे पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनी उमेदवारी दाखल केला आहे.                                                                 नगराध्यक्षा भाजप उमेदवाराच्या कार्यक्रमात असताना पती नागेश भोसले बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करत होते. नागेश भोसले यांच्या बंडखोरीमुळे पंढरपूर शहर व परिसरात भाजपाला धक्का बसू शकतो. तर भाजप उमेदवार समाधान अवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे यांनीही घरातूनच बंडखोरी करत भाजपाला आव्हान दिल्याने मंगळवेढ्यात भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.राष्ट्रवादीलाही असाच फटका बसला असून त्यांच्या मित्रपक्षातून बंडखोरी झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांनी उमेदवारी दाखल केली असून पक्षाने सचिन पाटील यांना पक्षाचा AB फॉर्म दिल्याने हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो. भारत भालके हे पहिली निवडणूक स्वाभिमानीकडून लढून विजयी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात मोठी ताकद असून राजू शेट्टी प्रचारासाठी तळ ठोकून थांबणार असल्याने राष्ट्रवादीला हे बंड वरिष्ठ पातळीवरून शांत करणे गरजेचे बनले आहे.


शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक शैला गोडसे यांनी उमेदवारी कायम ठेवत प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून आता शिवसेनेने त्यांचेवर निलंबनाची कारवाई केली आहे. शैला गोडसे या गेल्या 10 वर्षे महिला व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने करत आल्या असून महिलावर्गात त्या लोकप्रिय आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेत त्या सदस्य असून कार्यकर्ते व मतदारांच्या दबावामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत हि निवडणूक लढवणार असल्याची त्यांची भूमिका आहे.सध्या भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बंडखोरी शांत करणे हे मोठे आव्हान ठरणार असून याच्याशिवाय निर्णायक  ठरू शकणाऱ्या धनगर उमेदवारांची उमेदवारीही दोन्ही पक्षांच्या अडचणीत भर घालणारी ठरणार आहे. दरम्यान नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या पतीचे उमेदवारी भाजपासाठी फायद्याचे तर मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांची उमेदवार राष्ट्रवादीसाठी फायद्याचे असल्याचे मतदारा मधून बोलले जात आहे.

test banner