मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्र राज्याच् लक्ष लागून राहिलं आहे देशामध्ये पश्चिम बंगाल आसाम केरळ यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत त्यामध्येच पंढरपूर मंगळवेढा ची निवडणूक होत आहे या पोटनिवडणुकीचा निकाल ही पाच राज्याच्या मतमोजणी दिवशीच आहे राज्यांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर विधानसभेची पहिली पोटनिवडणूक आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे राज्यातील अर्ध मंत्रिमंडळ सध्या पंढरपुरात येऊन गेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तर तीन वेळा या मतदारसंघात यावं लागलं एकीकडे सत्ताधाऱ्यांचे असं चित्र असताना दुसरीकडे भारतीय जनता पार्टीनेही विरोधकांना आपला कमीपणा जाणवू दिला नाही राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या तीन प्रमुख नेत्यांचा दौरा झाला भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्यासोबत स्थानिक जिल्ह्याच्या आमदार प्रशांत परिचारक विधान परिषदेच्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, प्रभारी बाळा भेगडे यांनी सुरुवातीला प्रचाराची संपूर्ण धुरा आपल्यावर सांभाळली त्यांना जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची साथ होती प्रचाराच्या मधेच आमदार रणजित सिंह मोहिते पाटील कोरूना पॉझिटिव झाले त्यानंतर त्यांची बाजू आमदार राम सातपुते यांनी सांभाळली आमदार गोपीचंद पडळकर यांचेही झंझावाती दौरे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात झाले धनगर समाजा मध्ये प्रचंड अशी क्रेज असलेल्या पडळकर यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं मात्र मंगळवेढा शहर व तालुका पिंजून काढण्यात आणि समाधान अवताडे यांच्यासाठी अनेक गावांमध्ये पदयात्रा तसेच घरोघरी भेटीमध्ये सर्वाधिक योगदान राहिलंय ते म्हणजे शेतकरी नेते रयत क्रांती संघटनेचे प्रमुख माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचे .आपल्या ग्रामीणढंगाच्या भाषणाने त्यांनी सर्वांचच लक्ष वेधून घेतलं, प्रत्येकाच्या काळजात घर करावं असं त्यांचं भाषण असतं ,भारतीय जनता पार्टीकडे असलेली ही मुलुख मैदानी तोफ मंगळवेढा तालुक्यात चांगलीच धडाडली. महाविकास आघाडी मधील सर्वच नेत्यांना त्यांनी आपल्या भाषणातून धुऊन काढले महाविकास आघाडी सरकारचे अपयश, कोरोना हाताळण्यात आलेले अपयश, शेतकऱ्यांचे प्रश्न ,विजेचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, वाझे प्रकरणानंतर बॅकफूटवर आलेलं सरकार, दोन मंत्र्यांचे राजीनामे अशा प्रमुख मुद्दयांमधून सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर हल्ले चढवले. शरद पवार यांच्या साताऱ्यात झालेल्या पावसातील भाषणानंतर पावसात भाषण करण्याची नवी पध्दत सुरू झाली, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पावसात भिजत भाषण केलं त्यांच्या बाजूला भगीरथ भालके थांबले होते, त्या भाषणाची मार्केटिंग झाली, सदाभाऊंनी ही लेंडवे चिंचाळे या गावात पावसात भाषण केले मात्र त्याचा बाऊ केला नाही, त्यांच्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार विशेष टार्गेट राहिले, विठ्ठल कारखान्याच्या विषयावर पवारांवर तोफा डागत त्यांच्यासह विरोधकांना गार केले.