मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक येथील भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आपलं संपूर्ण लक्ष हे आपल्या स्थानिक मंगळवेढा शहरावर केले होते मंगळवेढा शहरात घरोघरी जात गाठीभेटीवर भर दिला सकाळी 9 वाजता त्यांच्या कार्यालयापासून प्रचार रॅलीला सुरुवात झाली, ही रॅली खंडोबा गल्ली, घुले गल्ली, गुंगे गल्ली, सराफ गल्ली, माने गल्ली ,गैबीपीर दरगाह, जावळे गल्ली, मुंडे गल्ली, नागणेवाडी,आठवडी बाजार, संत दामाजी चौक, मातंग समाज चौक, कारखाना रोड, कारखाना चौक, शहरातील प्रमुख मार्गावरून घरभेटी व पदयात्रा झाली, खंडोबा मंदिर, यल्लमा मंदिर, गैबीपीर दरगाह, संत दामाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले, अनेक ठिकाणी महिलांनी समाधान आवताडे यांचे औक्षण केले, वयोवृद्ध मातांनी आशीर्वाद दिला, अनेक ठिकाणी तर ज्येष्ठांनी समाधान आम्ही तुझ्या सोबत सदैव आहोत, तू घरापर्यंत का आलास असे म्हणून आशीर्वाद देत पाठीवर थाप दिली.
या रॅलीत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, कार्याध्यक्ष दीपक भोसले, भाजप जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, येताळा भगत ,दामाजी कारखान्याचे संचालक राजेंद्र सुरवसे, संचालक लक्ष्मण जगताप, युवराज शिंदे, पप्पू यादव, कैलास कोळी, अनिल पाटील ,वैभव खराडे ,सरोज काझी, चंदू राजमाने, शकील काजी, नगरसेवक चंद्रकांत पडवळे, विजय शिंदे, जनार्दन कोंडूभैरी, अशोक माळी ,गोपाळ भगरे, बाबा कोंडुभैरी, प्यारेलाल सुतार ,योगेश पगारे, अशोक लेंडवे, सुरेश जोशी, उमेश अवताडे, संग्राम पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा